‘Whats App’ वर एखाद्याने ‘ब्लॉक’ केल्यास असे करा ‘अनब्लॉक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकदा आपलं मित्र किंवा मैत्रिणीसोबत भांडण होतं आणि त्यानंतर ब्लॉक केलं जातं. तुम्हालाही असचं कुणीतरी ब्लॉक केलं असेलच. व्हॉट्सअ‍ॅप ब्लॉकिंग नोटिफिकेशन्स येत नाही. त्यामुळे आपल्याला कोणी कोणी ब्लॉक केलंय हे समजू शकत नाही. जाणून घेऊयात एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर कस ओळखायचं ?

असे ओळखा ब्लॉक केलेलं
१)
सर्वात आधी तुम्हाला मित्राचा प्रोफाईल फोटो, लास्ट सीन किंवा व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस दिसतं की नाही हे एकदा चेक करा. जर दिसत नसेल तर समजा की, तुम्हाला ब्लॉक केलं आहे.

२) व्हॉट्सअ‍ॅपवर फ्रेण्डला मेसेज पाठवला असेल आणि केवळ एकच टिक दिसलं, याचा अर्थ असा की मेसेज सेंड झाला आहे, पण डिलिव्हर झालेला नाही. म्हणजेच तुम्हाला ब्लॉक केलं आहे.

३) जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलंय असं वाटत असेल तर त्या व्यक्तीला ग्रुपमध्ये अ‍ॅड करा. जर त्या व्यक्तीला ग्रुपमध्ये अ‍ॅड करता आले नाही तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज येईल की तुम्ही या व्यक्तीला ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यासाठी परवानगी नाही.

४) ब्लॉक केलं असेल तर त्या व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येत नाही. त्यामुळे तुम्ही अशा व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅप कॉल करुन पाहू शकता. जर कोणतीही रिंग वाजली नाही, तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे.

स्वत:ला अनब्लॉक कसं कराल ?
१)
व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जा. यानंतर अकाऊंटवर क्लिक करा. त्यानंतर डिलीट माय अकाऊंटवर टॅप करा. Settings>Account>Delete my account वर जा. तुमचा फोन नंबर एंटर करा आणि अकाऊंट डिलीट करा.

२) यानंतर फोनमधून व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर अनइन्स्टॉल करा.

३) व्हॉट्सअ‍ॅप अनइन्स्टॉल केल्यानंतर फोन रिस्टार्ट करा.

४) अनइन्स्टॉल केल्यावर फोन एकदा रिस्टार्ट करा.

५) प्ले स्टोअरवर जाऊन पुन्हा एकदा नव्याने व्हॉट्सअ‍ॅप इन्स्टॉल करा आणि पूर्ण माहिती द्या.

६) ही प्रोसेस केल्यानंतर तुम्ही स्वत:ला फ्रेण्डच्या अकाऊंटमधून अनब्लॉक केलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा’
श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

You might also like