Lockdown कसा उठवायचा याबद्दल ICMR ने ठरवले निकष, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात थैमान घातलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने आता मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेत दिवसागणिक रुग्णसंख्या वाढू लागल्याने हॉस्पिटल अपुरी पडत होती. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यात लॉकडाऊन Lockdown लावला होता. मात्र आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनमध्येही सूट द्यायला सुरुवात झाली आहे. आयसीएमआरचे महानिदेशक डॉ. बलराम भार्गव यांनीही लॉकडाऊनमुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचे मान्य केले आहे. मात्र, लॉकडाऊन हा मोठ्या काळासाठीचा उपाय नाही, असे सांगत लॉकडाऊन Lockdown कसा हळू हळू संपवावा आणि त्याचा पर्याय कसा शोधावा याबाबतही 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

बारामती : राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरेंवर हल्ला कसा झाला ? इतिहासात पहिल्यांदाच घडलं ‘असं’

भार्गव म्हणाले की, ज्या ठिकाणी लॉकडाऊन शिथिल केला जाईल त्या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हीटी रेट गेल्या 7 दिवसांत 5 टक्क्यांहून कमी असायला हवा. तसेच 60 वर्षांहून अधिक वयाच्या आणि 45 वर्षे वयाच्या त्या लोकांना ज्यांच्यामध्ये अन्य कोणताही गंभीर आजार नाही. त्यांच्यापैकी 70 टक्क्यांहून अधिक लोकांना लस दिलेली असावी. याशिवाय नागरिकांनाही त्यांची जबाबदारी समजायला हवी. देशात डिसेंबरपर्यंत कोरोना लसीकरण पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

लसीकरणाबाबत लोकांनी धीर धरावा. भारत जगातील 5 देशांपैकी एक आहे जो लस बनवितो. अमेरिकेत जेवढी लस दिली गेली, तेवढीच आपल्याकडेही देण्यात आली आहे. परंतू आपली लोकसंख्या अमेरिकेच्या चौपट आहे. जुलै, ऑगस्टपर्यंत आपल्याकडे पुरेशी लस उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 21.58 कोटीहून अधिक डोस दिले आहेत. सोमवारी 18-44 वयोगटातील 12 लाख 23 596 लोकांना पहिला डोस देण्यात आला. तर 13 हजार 402 लोकांना दुसरा डोस दिला. देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवातीपासून 2,02,10,889 लोकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. तर 23,491 लोकांना दुसरा डोस दिला आहे.

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती

 

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत