नळाच्या पाण्यात ‘कोरोना’ किती दिवस ‘जिवंत’ राहू शकतो ? नवी ‘माहिती’ आली समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामध्ये मान्सून आल्यामुळे देशाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जूनच्या शेवटी किंवा जुलै महिन्यात पावसाळा सुरु झाला की, कोरोनाचे संक्रमण आणखी वाढू शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. तसेच या हवामानात जपानी एन्सेफलायटीस, डेंग्यू आणि मलेरियाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनाविरुद्धच्या युद्धामध्ये आधीच पूर्ण शक्ती लावणाऱ्या आरोग्य संस्था आणि नगरपालिका संस्थांवरही दाबाव अधिकच वाढणार आहे.

मुंबईच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबईच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. या अभ्यासात सहभागी असलेल्या संशोधकांनी म्हटले की, संक्रमणाचा दुसरा टप्पा पावसाळ्यात सुरु होऊ शकतो. त्यामुळे तापमान कमी झाल्यामुळे कोरोना रुग्णात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

आयआयएससी बंगळुरुचे प्राध्यापक राजेश सुंदरसन म्हणाले, परिवहनाच्या सहजतेने कोरोना प्रकरणात वाढीची चिंता आहे. आगामी काही दिवसांत हा आलेख किती वाढेल हे पावसाळ्यापासून सांगणे कठीण होईल. दिल्ली, मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांविरुद्ध लढा देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठ्या टीम एकत्रित करावे लागणार आहेत.

कोरोनाचा व्हायरस क्लोरीनशिवाय नळाच्या पाण्यात दोन दिवस जिवंत राहू शकतो, रुग्णालयातील घाण पाण्यातही तो 20 डिग्री तापमानात जगू शकतो आणि सांडपाणी आठवड्यात पाण्यात राहतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. हवेच्या स्तरात खोकला किंवा सर्दी दरम्यान बाहेर पडणाऱ्या थेंबामुळे पसरतो. परंतु, हवामानातील बदलांमुळे या थेंबामधील विषाणू बराच काळ जिवंत राहू शकते.