कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

नवी दिल्ली : भारतात दररोज लाखो लोकांना कोरोनाची व्हॅक्सीन (covid 19 vaccine ) दिली जात आहे. ताज्या आकड्यांनुसार देशात 21 कोटीपेक्षा जास्त लोकांना कोविडची व्हॅक्सीन (covid 19 vaccine ) दिली गेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉक्टर कॅथरीन ओब्रायन सांगतात की, पहिल्या डोसनंतर सुमारे दोन आठवड्यानंतर चांगली इम्युनिटी तयार होऊ शकते. तर दुसर्‍या डोसनंतर ही इम्यूनिटी खुप मजबूत होते.

तर शास्त्रज्ञ सांगतात की, व्हॅक्सीनचे दोन डोस घेतल्यानंतर यामुळे तयार होणारी इम्यूनिटी किती काळ राहील, याबाबत ठोस प्रमाण अस्तित्वात नाही. डॉक्टर कॅथरीन म्हणतात की, याबाबत कोणते स्पष्ट संकेत नाहीत की, याबाबत काही स्पष्ट सांगता येईल.

त्यांनी म्हटले, आम्ही त्या लोकांवर नजर ठेवून आहोत, ज्यांनी व्हॅक्सीन घेतली आहे. कारण ते कधीपर्यंत सुरक्षित आहेत हे जाणून घेता येईल. यासाठी आता शेवटच्या निष्कर्षांसाठी आपल्याला आणखी प्रतिक्षा करावी लागेल. सध्या काही गोष्टी माहिती आहेत, त्यामध्ये याचा समावेश आहे की फायजर व्हॅक्सीनचे दोन डोस घेतल्यानंतर किमान 6 महिन्यापर्यंत ते प्रभावी राहतात. असेच मॉडर्ना व्हॅक्सीनच्या बाबतीत आहे.

कोविशील्डने 1 वर्ष मिळते सुरक्षितता
डॉक्टर कॅथरीन यांच्यानुसार भारतात कोविशील्डची जी व्हॅक्सीन दिली जात आहे तिच्याद्वारे एक वर्ष इम्युनिटी राहण्याची आशा आहे. त्या म्हणाल्या, सध्या आपण काहीही स्पष्ट सांगू शकत नाही कारण ऑक्सफोर्डची सीएचएडीओएक्स1 तंत्राची व्हॅक्सीन एक वर्षापर्यंत इम्यूनिटी कायम ठेवू शकते.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने कमी होते इम्युनिटी?
कोरोना व्हायरसचे नवनवीन व्हेरिएंट सापडले आहेत. शास्त्रज्ञ म्हणत आहे की, व्हॅक्सीनचा तिसरा डोस सुद्धा दिला पाहिजे. यास बूस्टर डोस म्हटले जाते. भारतात कोव्हॅक्सीन बनवणार्‍या भारत बायोटेकने ’बूस्टर डोस’ची चाचणी सुद्धा सुरू केली आहे. हा बूस्टर डोस आता त्या लोकांना सहा महिन्यानंतर दिला जाईल ज्यांनी पहिल्या आणि दुसर्‍या डोसच्या ट्रायलमध्ये व्हॅक्सीन घेतली होती. कोव्हॅक्सीनची पहिली आणि दुसरी ट्रायल सप्टेंबर आणि डिसेंबर 2020च्या दरम्यान झाली होती.

तर, न्यूयॉर्क टाइम्समध्ये एका संशोधनाच्या संदर्भाने प्रसिद्ध रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जे लोक कोविड-19 मधून बरे झाले आहेत आणि नंतर व्हॅक्सीनचे दोन डोस सुद्धा घेतले आहेत, त्यांना कदाचित बूस्टर डोसची आवश्यकता भासेल.

Also Read This : 

 

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

 

मोदी सरकारचा मोठा निर्णय ! CBSE बारावीची परीक्षा रद्द
गाजराचा हलवा खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

 

Pune : नगरसेवक शंकर पवार यांचे पीएमपी संचालकपदास तूर्तास ‘जीवनदान’; भाजपने पक्षातील नाराजांना ‘गाजर’ दाखवले !

 

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?