Coronaviurs : ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था घरात करु शकतो का?, लस घेतल्यानंतर किती दिवसांनी अँटीबॉडीज तयार होतात? जाणून घ्या तज्ज्ञांची उत्तरे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्ये मोठी वाढ होत आहे. कोरोना व्हायरसने देशाच्या कानाकोपऱ्यात शिरकाव केला आहे. वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण तर आहेच, शिवाय रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारपर्यंत प्रयत्न करत आहेत. कोरोनाची लागण श्रीमंतापासून ते गरीबापर्यंत अशा सर्वांना होत असल्याने सर्वांमध्ये टेन्शन आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूची संख्या ऐकून सामान्य माणूस घाबरला आहे. त्यातच एखाद्या व्यक्तीला इतर आजार आहेत अशा व्यक्ती तणावात आहेत. कोरोना संबंधित अनेक प्रश्न आपल्या मनात आहेत. अशाच काही प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांनी दिली आहेत.

दिल्ली येथील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. गीता कामपाणी यांनी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. याची माहिती आपल्याला असणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांनी त्यांच्या मनातील विचारलेल्या प्रश्नांना डॉ. गीता यांनी उत्तर दिली आहेत. जाणून घेऊयात…

प्रश्न – जर रुग्णालयात ऑक्सिजन बेड शिल्लक नसेल तर आपण घरात ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करु शकतो का ?
उत्तर – जर तुमच्या घरात ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करता येत असेल तर ती तुम्ही करु शकता. मात्र, अशा परिस्थिती जेव्हा रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता असते तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल केलेले कधीही चांगले. कारण घरापेक्षा रुग्णालयात अधिक सुरक्षितता असते. रुग्णालयात योग्य उपचार केले जातात.

प्रश्न – जर ऑक्सिजनची समस्या नसेल, मात्र ताप जास्त असेल तर रुग्णालयात दाखल होऊ शकतो का ?
उत्तर – जर श्वास घेण्यास अडचण येत असेल आणि ऑक्सिजनची पातळी योग्य असेल मात्र ताप असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पॅरासिटामॉल घेऊ शकता. तापाच्या बाबतीत जर 3-4 दिवस पॅरासिटामोल घेतल्यानंतर जर ताप कमी होत नसेल तर अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल केले पाहिजे.

प्रश्न – दोन्ही कोरोना लस घेतल्यानंतर अँटीबॉडीज किती दिवसात तयार होतात ?
उत्तर – कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर 15 दिवसानंतर अँटीबॉडी तयार होतात. मात्र हे लक्षात घेतले पाहिजे की ही लस विषाणूविरुद्ध 100 टक्के प्रभावी नाही. ही लस केवळ 80-85 टक्केच प्रभावी आहे. त्यामुळे कोरोना लसीचे डोस घेतल्यानंतर देखील व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. फक्त लस घेतल्यामुळे शरिरात तयार झालेल्या अँटीबॉडीजमुळे कोरोनाचा धोका कमी असतो. परंतु विषाणू नसल्यास अधिक चांगले. यासाठी कोरोना एप्रोप्रियेट बिहेवियरचे अनुसरण करणे आवश्यक आहे.

प्रश्न – कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावरच आपण रुग्णालयात दाखल होऊ शकतो की प्रकृती खराब असली तरीही दाखल होऊ शकतो ?
उत्तर – रुग्णालयामध्ये दोन प्रकारचे बेड असतात. पहिले म्हणजे सस्पेक्ट बेड्स, जेथे जे रुग्ण पॉझिटिव्ह नाहीत पण त्यांच्यात कोरोनाची तीव्र लक्षणे आहेत. अशा लोकांना सस्पेक्ट बेड्सवर आरटीपीसीआर चाचणी करुन त्यांच्यावर उपचार केले जातात. या शिवाय, जे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत आणि त्यांचा ताप कमी होत नाही किंवा त्यांची ऑक्सिजनची पातळी कमी आहे त्यांना कोविड वॉर्डात ठेवले जाते.