टाइट जीन्स घालून लाँग ड्राईव्ह करणं पडलं महागात, झाला गंभीर आजार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टाइट जीन्स घालून लाँग ड्राईव्ह करणे पडले दिल्लीच्या एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. टाइट जीन्स घालून तासनतास ड्रायव्हिंग केल्याने त्याला जीवघेणा आजार झाला. सौरभ शर्मा (वय 30) असे या युवकाचे नाव आहे.
टाइट जींस पहन लॉन्ग ड्राइव पड़ी भारी, हो गई खतरनाक बीमारी

सौरभ शर्माला फिरण्याची खूप आवड आहे. 12 ऑक्टोबर रोजी टाइट जीन्स घालून अनेक तास कार चालविल्यामुळे, त्याच्या पायांच्या नसांतून होणारे रक्ताचे वहन अचानक थांबले. त्यामुळे त्याला पलमोनरी एंबॉलिज्म नावाचा आजार झाला. मात्र वेळेवर उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला.

या घटनेबाबत ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नवीन भामारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पलमोनरी एंबॉलिज्म हा एक जीवघेणा आजार आहे. सौरभ योग्य वेळी रुग्णालयात पोहोचू शकला नाही तर त्याचा जीव वाचवणे अवघड होते.
टाइट जींस पहन लॉन्ग ड्राइव पड़ी भारी, हो गई खतरनाक बीमारी

या गंभीर आजारापासून वाचलेला सौरभ आता तरूणांना एक सूचना देत आहे की, टाइट जीन्स घालून मुळीच ड्राईव्ह चालवू नका. जर तुम्ही टाइट जीन्स घालत असाल तर तुम्ही खूप काळजी घेणे आवश्यक आहे.

Visit : Policenama.com