अमेरिका केव्हापर्यंत बनवणार ‘कोरोना’ वॅक्सीन ? जाणून घ्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे उत्तर

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरस महामारीमुळे संपूर्ण जग प्रभावित आहे, परंतु सर्वात जास्त वाईट परिणाम अमेरिकेवर होत आहे. अशा स्थितीत अतुरतेने कोरोना वॅक्सीनची वाट पहिली जात आहे. रशियाने एकीकडे कोरोना व्हायरसवर वॅक्सीन बनवल्याचा दावा केला आहे, तर लोकांची नजर ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या वॅक्सीनकडे लागली आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी कोविड-19 ला एक नवा आणि शक्तिशाली अदृृश्य शत्रू जाहीर केले. अमेरिका या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना वॅक्सीन तयार करेल, असे त्यांनी म्हटले आहे.

व्हाइट हाऊसमध्ये रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेशनला संबोधित करताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, काही महिन्यांपासून आपला देश आणि संपूर्ण पृथ्वी एका नव्या आणि अदृश्य शक्तिमध्ये फसला आहे.

ते म्हणाले, आम्ही जीवन रक्षक थेरपी देत आहोत आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा त्यापूर्वी कोरोना वॅक्सीन तयार करू. आपण व्हायरस आणि महामारीला पराभूत करू आणि पहिल्यापेक्षा आणखी मजबूत होऊन उभे राहू.

ट्रम्प पुढे म्हणाले, अमेरिका या व्हायरसला नष्ट करेल. आपल्याकडे तीन वेगळ्या वॅक्सीन अंतिम टप्प्यात आहेत. आपण अगोदरपासूनच त्या बनवत आहोत, जेणे करून डोस उपलब्ध व्हावेत. आपल्याकडे या वर्षात एक सुरक्षित आणि प्रभावी वॅक्सीन असेल. सोबतच आपण व्हायरसला चिरडून टाकू.

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या ताज्या आकड्यांनुसार, अमेरिकेत कोरोना व्हायरसची आतापर्यंत 58 लाख 66 हजार 214 प्रकरणे आली आहेत आणि 1 लाख 80 हजार 814 लोकांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनुसार, आजच्या तारखेपर्यंत जगभरात 2 कोटी 43 लाख लोक कोरोना संक्रमित झाले आहेत आणि 8 लाख 29 हजार लोकांचा जीव गेला आहे.