हळदीचा चहा प्यायल्यानं वजन लवकरच होतं कमी, ‘या’ पध्दतीनं सेवन करा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रत्येकजण वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो. बदलते वातावरण आणि जीवनशैली यांच्यामुळे शरीराची योग्य काळजी घेतली जात नाही. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. यामध्ये लठ्ठपणाची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर जाणवते. वाढलेलं वजन कमी करणे हे अवघड होऊन बसतं. शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी डायट करणं, कमी खाणं, व्यायाम करणं, काही गोष्टी आहारातून वर्ज करणं असे अनेक प्रकारचे प्रयत्न सुरु असतात.

अनेकवेळा वजन कमी करण्यासाठी चहाचे सेवन करु नये असा सल्ला दिला जातो. कारण साखरेमुळे शरीरातील कॅलरीज वाढण्याची शक्यता असते. तसेच दुधाच्या अतिवापराने फॅट्समुळे वजन कमी होण्याऐवजी वजन वाढते. वजन कमी करण्यासाठी हळद घालून केलेला चहा फायदेशीर ठरतो. जाणून घ्या हळदीचा चहा पिल्याने कशाप्रकारे वजन कमी होण्यास मदत होते

कसा करायचा हळदीचा चहा
वजन कमी करण्यासाठी हळदाची चहा तयार करण्यासाठी जास्त साहित्याची गरज नसते. यासाठी सगळ्या आधी हळदीचे चूर्ण तुम्हाला तयार करावे लागेल. त्यानंतर आलं आणि पाण्याची आवश्यकता असते. हा चहा तयार करण्यासाठी एक ग्लास पाणी उकळत ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यात हळद आणि आल्याची पेस्ट घाला. 2 मिनिटांनी गॅस बंद करा. कोमट झाल्यानंतर या चहाचे सेवन करा.

हळदीच्या चहाचे फायदे
1. हेल्दी राहण्यासाठी या चहाचे सेवन केल्यास फायदेशीर ठरेल. अनेक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी हा चहा उपयुक्त ठरतो. मधूमेह, कॅन्सर आणि हृदयाच्या रोगांपासून बचाव होतो.

2. हळदीच्या चहाचे सेवन केल्याने शरीरातील फॅट्स तसंच वाढलेला भाग कमी होतो. हळदीमध्ये एंटी-इंफ्लेमेट्री गुण असतात. त्यामुळे शरीरातील फॅट्स वेगाने कमी होतात.

3. सहसा असं दिसून येतं की लठ्ठपणामुळे मेटाबॉलीक रेट कमी झालेला असतो. त्यामुळे शरीराची पचनक्रीया सुरळीत कार्य करत नाही. त्यामुळे शरीरातील चरबी वाढण्यास सुरुवात होते. हळदीच्या चहाचं सेवन केल्यास मेटाबॉलीक रेट व्यवस्थित राहतो. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.