‘हळदीचा चहा’ प्या आणि झटपट ‘वजन’ कमी करा, ‘हे’ 5 फायदे जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन –  लठ्ठपणाची समस्या खुप मोठ्याप्रमाणात वाढल्याचे सध्या दिसून येते. काही लोकांना लठ्ठपणा नसला तरी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. कारण वजन वाढले की, अन्य आजार आपोआपच शरीरात घुसखोरी करतात. यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे किंवा कमी करणे खुप महत्वाचे ठरते. डाएट करणे, कमी खाणे, व्यायाम करणे, काही पदार्थ आहारात टाळणे, असे प्रयत्न अनेकजण करत असतात. परंतु, वजन कमी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय असून ते केल्यास वजन सहजपणे कमी होऊ शकते. हळदीचा चहासुद्धा यापैकीच एक आहे, हा चहा कसा तयार करावा, याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

हळदीच्या चहाची कृती

1 एक ग्लास पाणी उकळत ठेवा.
2 पाणी उकळायला लागल्यानंतर त्यात हळद आणि आल्याची पेस्ट घाला.
3 दोन मिनीटांनी गॅस बंद करा.
4 कोमट झाल्यानंतर या चहाचे सेवन करा.

हे आहेत हळदीच्या चहाचे फायदे

1 हळदीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुण असल्याने तिच्या सेवनाने पचनक्रीया व्यवस्थित राहते. वजन कमी होते.
2 हळदीच्या चहाचे सेवन केल्याने मेटाबॉलीक रेट व्यवस्थित राहतो. त्यामुळे वजन कमी होते.
3 हळदीच्या चहाचे सेवन केल्याने शरीरातील फॅट्स तसेच वाढलेला भाग कमी होतो. हळदीमध्ये एंटी-इंफ्लेमेट्री गुण असल्याने शरीरातील फॅट्स वेगाने कमी होतात.
4 हेल्दी राहण्यासाठी या चहाचे सेवन लाभदायक आहे. अनेक आजारांपासून सुटका होते.
5 मधुमेह, कॅन्सर आणि हृदयाच्या रोगांपासून बचाव होतो.