‘कडधान्यां’चा वापर करून ‘वजन’ करा कमी, ‘हे’ 11 फायदे जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : लठ्ठपणा ही समस्या सध्या खुपच त्रासदायक ठरत आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे वजन नियंत्रणात ठेवणे हे सुद्धा एक आव्हान झाले आहे. वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर व्यायामासोबत आहारात योग्य ते बदल करणे खुप गरजेचे आहे. व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पोषक घटकांचा अभाव यामुळे वजन वाढू शकते. शिवास सतत बसून काम केल्यानेही वजन वाढते. वजन कमी करण्यासाठी कडधान्य खुप उपयोगी आहेत. रोजच्या जेवणात आपण वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश असतो आणि कधीतरी कडधान्यांचा समावेश रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात करा.

कडधान्य सेवनाचे फायदे
1 कडधान्यांतील प्रथिनं पचायला सोपी असतात. कडधान्य मोड आणून खाल्लीत तर अधिक फायदेशीर आहे.

2 मोड आणण्याच्या प्रक्रियमध्ये कडधान्य हलके होतात आणि पचायला सुलभ होतात.

3 मोड आलेली कडधान्य सुकवून ठेवता येतात. अशा सुकविलेल्या मोडामध्ये कर्बोदकांचे आणि क जीवनसत्वांचे प्रमाण अधिक असते.

4 शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी कडधान्य फायदेशीर ठरतात.

5 शरिराला उर्जा मिळते. न्यूट्रिशियन्स सुद्धा मिळतात.

6 मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने गॅस एसिडिटीची समस्या दूर होते.

7 कडधान्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असतं आणि प्रोटिन्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे वजन वाढत नाही, पोषक घटक मिळतात.

8 कडधान्यांचे सेवन करणे हे गरोदर महिलेसाठी लाभदायक आहे.

9 वाढत्या वयात तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी कडधान्यांचा आहार लाभदायक ठरतो.

10 कॉलेस्ट्रॉलची लेव्हल नियंत्रणात राहते. त्यामुळे हृदयाशी संबंधीत आजार होण्यापासून बचाव होतो.

11 डोळ्यांसाठी सुद्धा मोड आलेली कडधान्य उपयुक्त ठरतात.