पावसाळ्यात ‘अशी’ घ्या प्रायवेट पार्टची काळजी ! जाणून घ्या एक्सपर्ट्सच्या खास टीप्स

पोलीसनामा ऑनलाइन – पावसाळ्यात आरोग्य आणि त्वचेची खूप काळजी घ्यावी लागते. कारण यामुळं अनेक प्रकारचा संसर्ग होण्याचा धोका असतो. विशेष करून महिलांना युटीआय ( मूत्रमार्गाच्या भागात संसर्ग) होण्याचा धोका असतो. उष्णता घाम यामुळं बॅक्टेरियांची वाढ होते आणि संसर्ग होतो. याची काळजी घेण्यासाठी काही खास टीप्स जाणून घेऊयात.

1) कोरडे कपडे घालणे – या दिवसात जास्त करून कपडे ओले असतात. नीट सुकत नाहीत अशाच कपड्यांचा वापर केला यातील ओलसरपणामुळं आणि कपड्यांच्या घर्षणामुळंही त्रास होऊ शकतो. तुमची चिडचिड वाढू शकते. यासाठी सुकलेले कपडे घाला. व्हेंटीलेशन असेल अशा इनरवियर किंवा लिंगरी घाला.

2) घट्ट कपडे टाळा – घट्ट कपडे किंवा टाईट शॉर्ट घालणंही टाळा. यामुळं जास्त घाम येतो आणि जास्त बॅक्टेरिया तयार होतात. यामुळंही त्रास होऊ शकतो. व्हेंटीलेशन राहतील असे सैल कपडे घालावे. झोपताना तर कधीच टाईट कपडे घालू नये.

3) स्वच्छता आणि हायजिन – बॅक्टेरियल इंफेक्शन आणि दुर्गंधापासून दूर राहण्यासाठी प्रायवेट पार्ट स्वच्छ आणि हायजिन ठेवायला हवा. यासाठी सकाळी अंघोळी दरम्यान आणि रात्री झोपण्यापूर्वी दोनदा प्रायवेट पार्टची स्वच्छता राखणं गरजेचं आहे. यासाठी काही इंटिमेट वॉश प्रॉडक्टचाही वापर तुम्ही करू शकता.

4) स्वत:ला हायड्रेट ठेवा – युरिनरी ट्रॅक (मूत्रमार्ग) आणि आरोग्याची देखभाल करण्यासाठी भरपूर पाणी आणि फळांचा रस प्यायला हवा. पाण्याच्या जास्त सेवनाने विषारी द्रव्ये बाहेर टाकाली जातात. शरीरात पीएच लेवल बॅलंस राहते. वातावरणातील आर्द्रतेमुळं शरीर महत्त्वपूर्ण द्रव गमावतं. यामुळं लघवी करतान त्रास होऊ शकतो. जर काळजी घेतली नाही तर युटीआय संसर्ग होऊ शकतो.

5) निरोगी आणि संतुलित आहार – जास्त आम्लयुक्त आणि मसालेदार पदार्थ खाणं टाळायला हवं. नाही तर पीएच लेवल बिघडते. कांदा, लसूण, दही, स्ट्रॉबेरी आणि हिरव्या पालेभाज्यांसह प्रोबायोटीक्सनं समृद्ध अशा अन्नाचे सेवन करा. यामुळं योनीतील निरोगी जीवाणू वाढून संसर्गाचा धोका कमी होतो.