पोलिसांच्या गोळीबारातील मृत्यू ! NDA पेक्षा तिप्पट अधिक वाईट होता UPA चा काळ, जाणून घ्या आकडेवारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात नागरिकत्व कायदा आणि NCR लागू केल्यानंतर अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. या कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलनं केली जात आहेत. 2009 पासून 2018 पर्यंत प्रत्येक वर्षी कुठेना कुठे झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी किंवा शांत करण्यासाठी पोलीस ‘रॉयट कंट्रोल’ हा शब्दाचा प्रयोग करतात. काहीवेळा पोलिसांना आंदोलन करणाऱ्यावर गोळीबार किंवा लाठीचार्ज करावा लागतो. अशा घटनांमध्ये मागील दहा वर्षात तब्बल 720 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर हजारो लोक गंभीर जखमी झाले आहेत.

पुलिस फायरिंग में मौतें: NDA से तीन गुना ज्यादा खराब था UPA का दौर

मागील दहा वर्षातील घटना –

2010 : महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापुरमध्ये अणुप्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला होता. यावेळी ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये एका अधिकाऱ्यासह एका आंदोलकाचा मृत्यू झाला होता.

पुलिस फायरिंग में मौतें: NDA से तीन गुना ज्यादा खराब था UPA का दौर

2011 : बिहारच्या फारबिसगंजमध्ये एका कंपनीला जमीन देण्यावरून ग्रामस्थांनी विरोध केला होता. ग्रामस्थांनी कंपनीला दिलेल्या जमिनीच्या विरोधात आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार ग्रामस्थांचा मृत्यू झाला. तसेच पिंपरी चिंचवड जवळ असलेल्या मावळमध्ये पवना जलवाहिनीला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला होता.

पुलिस फायरिंग में मौतें: NDA से तीन गुना ज्यादा खराब था UPA का दौर

2012 : पश्चिम बंगाल मधील नंदीग्राममध्ये नागरिकांनी स्पेशल इकॉनॉमी झोनला विरोध केला होता. त्यावेळी केलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये 14 जाणांचा मृत्यू झाला होता.

पुलिस फायरिंग में मौतें: NDA से तीन गुना ज्यादा खराब था UPA का दौर

2013 : महाराष्ट्रातील धुळे येथे पोलिसांनी एका समुदायाच्या मुलांवर गोळीबारी केला होता. यामध्ये 6 तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता. असे सांगण्यात येते की आंदोलकांवर कारवाई करत असताना पोलिसांनी दुकाने लुटली.

पुलिस फायरिंग में मौतें: NDA से तीन गुना ज्यादा खराब था UPA का दौर

2015 : आंध्र प्रदेशातील चित्तूल जिल्ह्यातील शेषाचलम जंगलात पोलिसांनी अवैधरित्या झाडांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई केली होती. त्यावेळी झालेल्या गोळीबारात 20 लोकांचा मृत्यू झाला होता.

पुलिस फायरिंग में मौतें: NDA से तीन गुना ज्यादा खराब था UPA का दौर

2017 : मध्यप्रदेशातील मंदसौर मध्ये शेतकऱ्यांनी हमी भावाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता शेतकरी संतप्त झाल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत 5 लोकांचा मृत्यू झाला होता.

पुलिस फायरिंग में मौतें: NDA से तीन गुना ज्यादा खराब था UPA का दौर

2018 : तमीळनाडू येथील थूत्थुकुडीमध्ये स्टारलाईट कॉपर कंपनीकडून होत असलेल्या प्रदुषणाविरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादातून आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारीत 13 आंदोलकांचा मृत्यू झाला.
राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या आकडेवारीवरून काँग्रेस सरकारच्या कार्य़काळात 533 लोकांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला.

पुलिस फायरिंग में मौतें: NDA से तीन गुना ज्यादा खराब था UPA का दौर

वर्ष मृत्यू झालेल्यांची संख्या
2009 – 4
2010 – 239
2011 – 109
2012 – 78
2013 – 103
एकूण 533

पुलिस फायरिंग में मौतें: NDA से तीन गुना ज्यादा खराब था UPA का दौर

राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या आकडेवारीवरून भाजप सरकारच्या कार्य़काळात 187 लोकांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला.

वर्ष मृत्यू झालेल्यांची संख्या
2014 – 41
2015 – 42
2016 – 57
2017 – 34
2018 – 13
एकूण 187

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/