एका लग्न सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी शाहरूख खान घेतो ‘एवढे’ कोटी, रक्कम वाचून तोंडात घालाल बोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा किंग ऑफ रोमान्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानची जादू फक्त सिनेमा किंवा छोट्या पडद्यापर्यंत सिमीत नाही. तर तो अभिनेता असल्याबरोबर एक निर्माता सुद्धा आहे. तसेच त्याची रेड चिली नावाची बॉलिवूडची एक मोठी प्रॉडक्शन कंपनी आहे. त्याशिवाय तो कोलकाता नाइट रायडर्स या आयपीएल टीमचा मालक आहे. तथापि, एक रिपोर्टनुसार, शाहरुख खान दुबईत हाय प्रोफाइल लग्नात परफॉर्म करण्यासाठी जवळपास ८ कोटी रुपये घेतो.

मोजक्याच लग्नात लावतो हजेरी
शाहरुखच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, तो व्यस्त असल्याने जास्त विवाहसोहळ्यात जाणे टाळतो. म्हणून वर्षभरात काही निवडक अशा विवाहसोहळ्यात तो हजेरी लावतो.

मागील दीड वर्षांपासून तो कोणत्याही चित्रपत्रात झळकला नाही. त्याचे चाहते त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये ‘झीरो’ या सिनेमात तो अखेरचा दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी झाला होता. त्यानंतर किंग खानला आगामी चित्रपटांची निवड करताना कोणतीही चूक करायची नव्हती.

अनेक सिनेमांना शाहरुखने दिला नकार
गेल्या दोन वर्षांपासून संजय लीला भन्साळी, मधुर भांडारकर, सलमान खान आणि अली अब्बास जफर यांसारख्या मोठ्या दिग्दर्शकांना शाहरुखने नकार दिला आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या वृत्तानुसार, शाहरुखने राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये काम करण्यास होकार दिला होता. मात्र, चित्रपट फ्लोअरवर जाण्यापूर्वीच त्याने काम करण्यास नकार सांगितला.

तसेच दिग्दर्शक मधुर भांडारकरने शाहरुखला इंस्पेक्टर गालिबच्या नावाने एका अॅक्शन चित्रपटाची ऑफर दिली होती. चित्रपटाच्या स्क्रीप्टसोबत भूमिका आवडलेली असताना सुद्धा शाहरुखने चित्रपटात काम करण्यास नकार दिला. कारण किंग खानाला वाटले की मधुर भांडारकर शाहरुख खानला मोठ्या एक्शन रुपात सादर करणार नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like