पाकिस्तानमध्ये देखील कृष्ण मंदिर, तिथं जन्माष्टमीला आजही होते पुजा

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – एक काळ होता जेव्हा पाकिस्तानच्या रावळपिंडी आणि लाहोर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदू आणि शीख लोकं राहत असत. परंतु भारत-पाक फाळणी नंतर ह्या परिस्थिती मध्ये मोठा बदल झाला. या शाहरांमध्ये भगवान श्री कृष्णाची अनेक मंदिरे आहेत परंतु आधीच्या तुलनेत कमीच राहिली आहेत. परंतु इथे राहिलेल्या मंदिरांमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळते.

इस्कॉन ची दोन भव्य मंदिरे

फाळणी नंतर पाकिस्तानमधील अनेक सुंदर अशा मंदिरांचे मोठे नुकसान झाले होते. काही जुनी मंदिरे काळानुरूप जीर्ण होत गेली. परंतु आजही जवळ -जवळ भगवान श्री कृष्णाची एक डझन मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यापैकी काही मंदिरे चांगल्या स्थतीत आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये इस्कॉन ने सुद्धा इथे दोन भव्य मंदिर बांधले आहेत. सर्वात आधी जाणून घेऊयात त्या भगवान श्री कृष्णाच्या मंदिराबाबत जे रावळपिंडी शहरामध्ये असून, हे तब्बल १२१ वर्ष जुने मंदिर आहे. परंतु मागच्या काही वर्षांपासून अतिशय खराब स्थितीत आहे. पाकिस्तान सरकारने या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दोन करोड रुपये मंजूर केले आहेत.

खूप कमी मंदिरामध्ये दिसातून दोन वेळ पूजा

असं सांगितलं जातं कि, पाकिस्तान मध्ये काहीच निवडक मंदिरं आहेत. ज्यामध्ये दिवसातून नेमाने दोन वेळेस पूजा होत असते. त्यामध्ये लोकं भाग घेत असतात. परंतु, इतर मंदिराबाबत हि स्थिती नाहीये. जेव्हापासून इस्कॉन ने कराची आणि क्वेट्टा या दोन शहरांमध्ये कृष्ण मंदिर बनवले आहेत. तेव्हापासून मंदिरात गर्दी जमत असल्याचे दिसून येत आहे.

येथे येतात भारतीय राजदूत ‘पूजेसाठी’

पाक मधील आघाडीच्या डॉन या वृत्तपत्रानुसार, शरणार्थी ट्रस्ट संपत्ति बोर्ड (ईटीपीबी) ने असे सांगितले कि, सरकारकडून दोन करोड रुपये मिळताच मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु केले जाईल. काम कोणत्या प्रकारे केले जाईल हे सुद्धा निश्चित केले गेले आहे. या मंदिराचे निर्माण १८४९ साली सद्दर मध्ये कांची मल राम पांचाल यांनी केले होते. फाळणी नंतर काही काळासाठी हे मंदिर बंदही होते. १९४९ साली ते पुन्हा सुरु करण्यात आले. याआधी इथे राहणारे हिंदू धर्मीय याची देखभाल करत असत. १९७० साली हे मंदिर ईटीपीबीच्या नियंत्रणात आले. १९८० पर्यंत इस्लामाबाद मध्ये राहणारे भारतीय राजदूत येथे पूजा करण्यासाठी येत असत.

जन्माष्टमीला लाहोर सजत असते

फाळणी पूर्वी लाहोर या शहरात मोठ्या प्रमाणावर हिंदू राहत असत. जिथं त्यांची खूप मंदिरं होती. आजही येथे हिंदूंची जवळ – जवळ २२ मंदिरे आहेत. परंतु दिवसातून दोन वेळा पूजा केवळ दोनच मंदिरात होत असते. या दोन मंदिरांपैकी एक मंदिर भगवान श्री कृष्णाचे आहे तर दुसरे वाल्मिकी मंदिर आहे.
प्रत्येक जन्माष्टमीला लाहोर सजत असते. इथे राहणारे हिंदू मंदिरात येत असतात. लाहोर मधील केसपुरा मध्ये असलेल्या मंदिरात ९० च्या दशकात मंदिराचे खूप नुकसान झाले असल्याच्या बातम्या येत होत्या. जेव्हा भारतात अयोध्येतील वादातीत मस्जिद तोडली गेली होती. त्यावेळेस हे मंदिर अतिशय खचले गेले. परंतु नंतर सरकरने १.२ कोटी रुपये खरंच करून त्याच्या स्थितीत सुधारणा केली.

अमरकोट मध्ये राहतात मोठ्या प्रमाणावर हिंदू

पाकच्या अबोटाबाद आणि हरिपूर मध्ये प्राचीन मंदिर आहे पण ते तुटलेल्या अवस्थेत आहे. जिथं कसलीही पूजा होत नाही. अमरकोट मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर हिंदू राहतात. हिंदू राहत असलेल्या थारपरकार मध्ये एक हिंदू मंदिर आहे. या दोन्ही मंदिरात श्रद्धाळू हिंदू पूजेसाठी येत असतात.

सर्वात जास्त मंदिरं सिंध प्रांतात

सर्वात जास्त मंदिरं सिंध प्रांतात आहेत. त्यांची संख्या ५८ आहे. ज्यात एकट्या कराची शहरात २८ मंदिरं आहेत. परंतु यामधील अतिशय कमी मंदिरात पूजा पाठ चालत असतो. इतर मंदिरं खूप जुनी असून अतिशय जीर्ण अवस्थेत आहेत. कराची मध्ये श्री स्वामी नारायण मंदिर आहे. इथं इस्लाम चे अनुयायीही येत असतात. ज्यात हरे कृष्ण महाराज आणि राधा कृष्णदेव यांच्या मूर्ती आहेत. काही वर्षांपूर्वी इस्कॉन ने जिना एअरपोर्ट च्या जवळ राधा गोपीनाथ मंदिर बनवले होते. हे खूप मोठे मंदिर आहे. जिथं नियमित कामकाज चालू असतं.

क्वेट्टा मध्ये आहे इस्कॉन ने बांधलेले मंदिर

क्वेट्टा मध्ये सुद्धा भगवान श्री कृष्णाचे एक मंदिर आहे. जे २००७ मध्ये पाकिस्तान सरकारकडून जमीन घेऊन इस्कॉन ने बांधले होते. इथं सुद्धा भगवान कृष्णाची पूजा अर्चा चालत असते. अशात पाकिस्तान सरकार ने इथे पर्यटन ला चालना मिळावी या हेतूने प्राचीन हिंदू आणि बौद्ध मंदिरांच्या कडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे. या ठिकाणांना पर्यटन स्थळांच्या रूपात विकसित केलं जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –