2014 च्या विधानसभेत ‘ही’ होती परिस्थिती, जाणून घ्या पक्षीय ‘बलाबल’ आणि सर्वकाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 2014 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांवेळी महाराष्ट्रामधील सर्व प्रमुख मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढत झाली होती. 2014 लोकसभा निवडणुकांमधील अपयशाच्या पार्श्वभूमीवर सत्तेवर असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आपली आघाडी मोडत निवडणुक वेगळ्याने लढवण्याचे ठरवले. तसेच जागावाटपावरून एकमत होऊ न शकल्यामुळे भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांची 25 वर्षे सुरू असलेली युतीदेखील संपुष्टात आली होती.

2014 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांवेळी 12 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली होती. तसंच 15 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले होते. यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 122 जागा, शिवसेनेस 63, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या.

पक्षीय बलाबल (2014) –

भाजपा – 122
शिवसेना – 63
काँग्रेस – 42
राष्ट्रवादी काँग्रेस – 41
अपक्ष – 7
एमआयएम – 2
बहुजन विकास आघाडी – 3
शेकाप – 3
मनसे – 1
सपा – 1
राष्ट्रीय समाज पक्ष – 1
भारिप बहुजन महासंघ – 1
माकप – 1

विदर्भ (एकूण जागा – 63)

भाजपा – 45
शिवसेना – 03
काँग्रेस – 10
राष्ट्रवादी, भारिप – 1- 1
अपक्ष – 2

पश्चिम महाराष्ट्र (एकूण जागा – 70)

भाजपा – 24
शिवसेना – 13
काँग्रेस – 10
राष्ट्रवादी – 19
शेकाप, अपक्ष, मनसे, रासप – प्रत्येकी 1

उत्तर महाराष्ट्र (एकूण जागा – 35)

भाजपा – 13
शिवसेना – 07
काँग्रेस – 07
राष्ट्रवादी – 6
माकप, अपक्ष – प्रत्येकी 1

मराठवाडा (एकूण जागा – 46)

भाजपा – 15
शिवसेना – 11
काँग्रेस – 09
राष्ट्रवादी – 08
एमआयएम – 01
अपक्ष – 2

मुंबई (एकूण जागा – 36)

भाजपा – 18
शिवसेना – 13
काँग्रेस – 05
एमआयएम – 01

ठाणे-कोकण (एकूण जागा – 38)

भाजपा – 07
शिवसेना – 15
राष्ट्रवादी -08
काँग्रेस – 1
शेकाप – 2
बविआ – 3
सपा, अपक्ष – प्रत्येकी 1

Visit – policenama.com 

You might also like