फाशी लावणार्‍या जल्लादास किती पैसे मिळतात ? स्वतः उघड केलं ‘गुपित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणातील दोषींना कधीही फाशी दिली जाऊ शकते. दोषींची दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. त्यावर निर्णय होताच चारही दोषींना फाशी दिली जाऊ शकते. यासाठी एक विशेष फाशी देणारी दोरीही तयार केली जात असून फाशी देणाराचा शोधही सुरू झाला आहे.

फाशी देण्याची वेळ काय आहे, संपूर्ण प्रक्रिया काय आहे, फाशी दिल्यावर फाशी देणाऱ्यास किती पैसे मिळतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी एका वृत्तवाहिनीच्या टीमने पवन जल्लाद यांच्याशी संवाद साधला. ज्यांचे संपूर्ण कुटुंब फाशी देण्याच्या कामात आहे.

जेव्हा त्या टीमने पवन जल्लादला विचारले की तुम्हाला फाशी देण्याचे किती पैसे मिळतात, तेव्हा पवन उत्तरला, “पूर्वी या कामाची जुन्या काळात मला बरीच रक्कम मिळत असे. त्यावेळी मला १०० रुपये मिळत होते. परंतु ही रक्कम जुन्या काळात खूप मोठी होती. २०१३ पर्यंत तिच्यात वाढ होऊन ३ हजार रुपये झाली होती, पण ही रक्कम आजच्या तुलनेत खूपच कमी होती. त्यानंतर आम्ही यासाठी आवाज देखील उठविला होता. आता फाशी देण्याचे ५ हजार रुपये मिळतात.”

पवन कुमारच्या कुटूंबाने आतापर्यंत २५ हून अधिक लोकांना फाशी दिली आहे. या जल्लाद कुटुंबाची कहाणी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लक्ष्मण, काळूराम, बब्बू सिंह यांच्यानंतर आता पवन जल्लाद पर्यंत येऊन ठेपली आहे.

विशेष म्हणजे निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्याचा सुगावा लागताच फाशीची शिक्षा देण्यासाठी जल्लादाचा शोध घेणे सुरु झाले आहे. तिहार तुरूंग प्रशासनाने उत्तर प्रदेशच्या जेल प्रशासनाला फाशी देणार्‍याचा शोध घेण्यासाठी पत्र लिहिले आहे. ९ डिसेंबर रोजी तिहार कारागृह प्रशासनाने एक पत्र लिहिले होते, ज्यात उत्तर प्रदेश जेल प्रशासनाकडून फाशी देणाऱ्यांविषयी तपशील मागविला गेला होता.

निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्यासाठी जल्लादाची आवश्यकता असेल. यूपीमध्ये दोन फाशी देणारे आहेत. यूपी जेल प्रशासन या दोघांपैकी एकाला तिहार कारागृहात पाठविण्यात येईल. या कामासाठी, तिहार जेल प्रशासनाकडून फाशी देणाऱ्यांचा सर्व खर्चासाहित प्रवास खर्चही उचलला जातो.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/