‘बिग बॉस-१२ ‘ सीजनसाठी सलमान घेणार ‘एवढे’ मानधन !

मुंबई :वृत्तसंस्था 
टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चं १२ वं सीजन येत्या १६ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. सलमान खान गेल्या नऊ वर्षांपासून ‘बिग बॉस’चं सूत्रसंचालन करत आहे. ‘बिग बॉसच्या १० व्या सीजनची घोषणा होण्याआधी यंदाच्या सीजनसाठी सलमानच्या मानधनात वाढ होणार नाही, अशा बातम्या येत होत्या. मात्र सलमानच्या मानधनात वाढ झाल्याचं आता समोर आलं आहे.

जाहिरात

सलमान खानने गेल्या वर्षी बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी ११ कोटी रुपये मानधन घेतलं होतं. मात्र नव्या रिपोर्टनुसार, सलमानला बिग बॉसच्या १२ व्या सीजनसाठी एका एपिसोडसाठी १४ कोटींचं मानधन मिळणार आहे. यंदाचं सीजन रात्री १०. ३० वाजता टेलिकास्ट न होता, रात्री ९ वाजता टेलिकास्ट होणार आहे. विशेष म्हणजे यंदा बिग बॉसचं हे १२ वं पर्व लोणावळ्यात नाही तर गोव्यात होणार आहे. ‘बिग बॉस’च्या बाराव्या सीझनमध्ये भारती सिंग, हर्ष लिंबाचिया व अनूप जलोटा यांच्यासह आणखीन कोण सेलेब्रिटी एन्ट्री करणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. प्रेक्षक आता बिग बॉस सुरू होण्याची वाट पाहत आहेत.
You might also like