जाणून घ्या नीता अंबानी शाळेत जाताना ईशा, आकाश आणि अनंत यांना किती पॉकेट मनी द्यायच्या

पोलीसनामा ऑनलाइन – अनेकांना असे वाटते की श्रीमंत व्यक्तीच्या घरात जन्माला येणं नशीबाची गोष्ट आहे. त्यांचे आयुष्यही सर्वात सुखी, समाधानी असते असे वाटते. मात्र, मुकेश अंबानी आणि नीता अंबानींच्या मुलांबाबत असे नव्हते. कधी तुम्ही याबद्दल विचार केला का की, नीता अंबानी ईशा, आकाश आणि अनंत अंबानींना शाळेत जात असताना किती पॉकेट मनी द्यायच्या. तर एका मुलाखतीत बोलताना त्यांनी म्हटले की, त्या मुलांना फक्त ५ रुपये देत होत्या.

जगात सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत असणाऱ्या अंबानी यांनी आपल्या मुलांना मिडिल क्लास व्हॅल्यूजसोबत वाढवलं. २०११ साली एका मुलाखतीत बोलताना नीता अंबानी यांना प्रश्न विचारला की, तुम्ही तुमच्या मुलांना खर्चासाठी किती पैसे देत होता. तेव्हा त्या म्हणाल्या, “ज्यावेळी माझी मुले लहान होती, तेव्हा मी त्यांना दर शुक्रवारी ५ रुपये द्यायचे. त्या पैशातून ते शाळेतील कॅन्टीनमध्ये खर्च करत असे. एक दिवशी माझा लहान मुलगा अनंत माझ्या रुममध्ये आला आणि मला १० रुपये त्याने मागितले.”

“तेव्हा मी त्याला विचारले असता त्याने सांगितले की, जेव्हा तो ५ रुपयांचे नाणे शाळेतील मित्रांना दाखवतो. तेव्हा मित्र त्याच्यावर हसतात आणि त्याला म्हणतात की, ‘तू अंबानी आहे की, भिकारी.’ हे ऐकून नीता आणि मुकेश अंबानी दोघांनाही हसू आले होते.”

दरम्यान, नीता अंबानी यांनी लग्नकरण्यापूर्वी शिक्षिका होण्याची इच्छा होती. त्यांनी लग्नानंतर कुटूंबाची जबाबदारी घेतली. मुलाखतीत बोलताना त्यांनी त्यांच्या पालन पोषणबाबत सांगितले. त्यांनी म्हटलं की, कशाप्रकारे त्यांची आई शिस्तप्रिय होती. त्यामुळे त्यांना वर्षातून केवळ ४ वेळाच बाहेर जायला मिळायचे आणि त्यांना पॉकेट मनीही मिळत नव्हती.