‘एवढ्या’ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे नवाजुद्दीन सिद्दीकी, जाहिरात आणि सिनेमासाठी किती फी घेतो जाणून घ्या !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीची स्टोरी खूप संघर्षमय आहे. एक वॉचमेन असणाऱ्या नवाजनं मोठ्या मेहनतीनं नाव कमावलं आहे. आज नवाज कोट्यावधीचा मालक आहे. इंडस्ट्रीत येऊन नवाजला जवळपास 21 वर्षे झाली आहेत. आज सर्वात जास्त फी घेणाऱ्या अ‍ॅक्टरच्या यादीत त्याचंही नाव आहे. आज आपण त्याची संपत्ती किती आहे हे जाणून घेणार आहोत.

एक रिपोर्टनुसार, बॉलिवूड स्टार नवाजुद्दीनची एकूण संपत्ती 153.34 कोटी आहे. यात जाहिरातींमधून मिळणाऱ्या कमाईचाही समावेश आहे. नवाजुनद्दीन ब्रँडचा प्रचार करण्यासाठीही मोठी फी घेतो.

कोट्यावधींची फी घेतो नवाज
गेल्या काही वर्षात नवाजच्या उत्पन्नात 24 टक्के वाढ झाली आहे. आयकर देण्याच्या बाबतीतही नवाज टॉपवर आहे. नवाज मुंबईतील वर्सोवाच्या लग्जरी व्हिलामध्ये रहातो. त्याच्या घराची किंमत 12.8 कोटी आहे. कारबद्दल बोलायचं झालं तर त्याच्याकडे जगातील सर्वात चांगल्या लग्जरी कार आहेत. मर्सिडिज बेंज, बीमडब्ल्यू, ऑडी अशा अनेक कार त्याच्याकडे आहेत. नवाज एका सिनेमाचे जवळपास 6 कोटी घेतो. एखाद्या ब्रँडच्या प्रचारासाठी जवळपास तो 1 कोटींची फी घेतो.