‘तारक मेहता’ मधील कलाकार एका एपिसोडसाठी घेतात ‘एवढी’ फी, जाणून घ्या कोण किती कमावतं !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेला आता 12 वर्षे पूर्ण होत आहेत. या शोनं चाहत्यांमध्ये वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, मालिकेतील कलाकार एका एपिसोडसाठी किती फी घेतात. त्याची संपत्ती नेमकी किती आहे. याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

1) दिलीप जोशी –  मीडिया रिपोर्टनुसार, जेठालाल चंपकलाल ही भूमिका साकारणारा दिलीप जोशी प्रति एपिसोड 1.5 लाख रुपये फी घेतो. इतर कलाकारांच्या तुलनेत जेठालाल लोकांचा फेवरेट चेहरा आहे त्यामुळं त्याला जास्त फी मिळते. त्याची एकूण संपत्ती 37 कोटींची आहे.

2) दिशा वकानी –  मालिकेत दयाबेन साकारणारी दिशा वकानी सध्या मॅटर्निटी लीववर आहे. 2015 साली तिंन व्यावसायिक मयुर पंड्यासोबत लग्न केलं. तिचीही एकूण संपत्ती 37 कोटींची आहे.

https://www.instagram.com/p/B1RRK0dBgto/?utm_source=ig_embed

3) मुनमुन दत्ता –  बबीताची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ता हिला प्रति एपिसोड 30-35 हजार रुपये मिळतात. तिची लोकप्रियता एवढी आहे की, खऱ्या नावाऐवजी लोक तिला बबीता अय्यर म्हणूनच ओळखतात.

4) शैलेष लोढा – तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेष लोढाची संपत्ती 7 कोटी असल्याची माहिती आहे. त्याला कॉमेडी शो केल्यानंतर प्रति एपिसोड 1 लाख रुपये मिळतात.

https://www.instagram.com/p/B_MY9IiFXEk/?utm_source=ig_embed