10 वर्षांत करोडपती व्हायचंय ? तर दर महिन्याला करावी लागेल इतकी गुंतवणूक

पोलीसनामा ऑनलाईन टीम : प्रत्येकाचे स्वप्न असते कि, आपण ऐशो आरामात जीवन जगले पाहिजे. त्यासाठी आपण बरेच गुंतवणुकीचे पर्यायही पाहतो. मात्र, पाहिजे तसा परतावा मिळत नाही. जर आपणही 10 वर्षांत करोडपती होण्याचे लक्ष्य ठेवत असाल तर इन्व्हेस्टोग्राफीची संस्थापक श्वेता जैन सल्ला देतात की, आपण स्टॉक मार्केटमध्ये अशी गुंतवणूक केली पाहिजे कि, दर वर्षी तुम्हाला 12% परतावा मिळेल. श्वेता जैन असाही सल्ला देतात की, गुंतवणूकदारांनी दीर्घ मुदतीमध्ये गुंतवणूक करावी आणि दररोज स्टॉक किमतीकडे लक्ष देणे टाळले पाहिजे. दिवसभरातच शेअर बाजारात अनेक चढ-उतार होत असतात, अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोजच्या किंमतींकडे नजर टाकली तर विनाकारण चिंता वाढेल.

अनेक वेळा गुंतवणूकदारांना शेअर बाजारात चांगले उत्पन्न मिळू शकत नाही कारण त्यांना त्यांचे भांडवल जाण्याची भीती असते. श्वेता जैन म्हणतात की यासाठी गुंतवणूकदाराने 10 वर्षांसाठी स्टॉकमध्ये गुंतवणूक केली पाहिजे आणि त्यानंतर त्याला चांगला परतावा मिळेल.

सुरुवातीला गुंतवणूकदाराने स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करावी. 5 वर्षानंतर त्याने आपल्या मासिक बचतीला हायब्रीड केले पाहिजे आणि त्यानंतर 8 वर्षानंतर बाँडमध्ये गुंतवणूक करावी जेणेकरून शेअर बाजाराकडून मिळालेल्या परताव्याची हमी मिळेल. जर आपण 10 वर्षांत करोडपती होण्याचे स्वप्न पाहत असाल तर आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये दरमहा सुमारे 43 ते 45 हजार रुपये गुंतवणूक करावी लागेल.