काय सांगता ! होय, अंघोळ न केल्यानं शरीराला होतात ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सर्वांनाच दररोज अंघोळ करण्याची सवय असते. मात्र असेही काहीजण असतात की, त्यांना हिवाळ्याच्या दिवसात अंघोळ करायचे म्हटले तर जीवावर येते. तुम्हालाही हिवाळ्यात अंघोळीचा कंटाळा येत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत. त्वचा तज्ञ्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळाच्या दिवसात रोज अंघोळ केल्याने त्वचेचे नुकसान होते. काही एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळ्यात अंघोळ करणे शरीरासाठी काही प्रमाणात नुकसानकारक ठरू शकते.

स्किन स्वतःला स्वच्छ ठेवते
लोक रोज अस्वच्छ किंवा घाणेरडेपणामुळे नाही तर समाजाच्या दबावामुळे अंघोळ करतात, असे अनेक अभ्यासातून समोर आल्याचे अमेरिकेतील ड्रर्मेटॉलोजिस्ट डॉक्टर रनेला यांनी सांगितले. ते म्हणाले की, त्वचेमध्ये स्वतःला स्वच्छ ठेवण्याची क्षमता असते. जर तुम्ही रोज व्यायाम करत नसाल, घाम गाळत नसाल तर तुम्ही रोज अंघोळ करणे गरजेचे आहे.

रोज अंघोळ केल्याने त्वचा कोरडी पडते
हिवाळ्याच्या दिवसात जर तुम्ही जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर त्यामुळे नुकसान होऊ शकते. तुमची त्वचा कोरडी पडते. कारण त्वचेतील नैसर्गिक तैलयुक्त पदार्थ निघून जातात. हे नैसर्गिक तेलयुक्त पदार्थ त्वचेला सुरक्षित ठेवतात, म्हणून रोज 10 मिनिटांपेक्षा जास्तवेळ अंघोळ करू नये.

बॅक्टेरिया शरीरासाठी फायदेशीर
तुमची त्वचा चांगले बॅक्टेरिया तयार करून नेहमी त्वचेला हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करते. जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील सहाय्याक प्राध्यापक डॉक्टर सी बँडन मिशेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंघोळ केल्यानंतर त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. यातून अनेकदा चांगले बॅक्टेरियाज निघून जातात. बॅक्टेरियाज इम्यून सिस्टीमला सपोर्ट करण्यासाठी चांगले मानले जातात. त्यासाठी हिवाळ्यात आठवड्यातून दोन किंवा तीनवेळा अंघोळ करावे.

नखांचे नुकसान
दररोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या नखांचेही नुकसान होते. आंघोळीच्या वेळी, आपली नख पाणी शोषून घेतात, नंतर मऊ होतात आणि तुटतात. त्यांचे नैसर्गिक तेल देखील बाहेर पडते ज्यामुळे ते कोरडे व कमकुवत होते.

रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम
विज्ञानानुसार आपण या हंगामात दररोज आंघोळ केली तर प्रतिकारशक्ती देखील कमी होत आहे. जगभरातील तज्ञांचे मत आहे की हिवाळ्याच्या काळात दररोज आंघोळ करणे फायदेशीर ठरते. पण एकापेक्षा जास्तवेळा आंघोळ केल्याने आपली त्वचा खराब होते.

पाण्याचा अपव्यव
दररोज आंघोळ केल्यामुळे पाण्याचा अपव्यय देखील होतो. एका अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्तीच्या आंघोळीमध्ये दररोज 55 लिटर पाणी वाया जाते. जरी आपण शॉवर घेतला तरी ते पाण्याचा अपव्यय होतो.