ICC World Cup 2019 : पाकिस्तान उत्तम खेळला तरी सेमीफायनलची चावी ‘या’ तीन संघांच्या हातात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची कामगिरी हि दमदार होत असताना पाकिस्तानी संघाची मात्र सुमार कामगिरी होताना दिसत आहे. भारतीय संघाबरोबर झालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव तर पाकिस्तान संघावर टीका सुरु झाली होती.

भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. मात्र दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध दमदार विजय मिळवत पाकिस्तानने कमबॅक केला आहे. या दोन विजयांमुळे त्यांची सेमीफायनलमध्ये जाण्याची आशा उंचावली आहे. पाकिस्तानचे या स्पर्धेतील अजून दोन सामने बाकी आहेत.

मात्र या सगळ्यात पाकिस्तान सध्या गॅसवर असून या दोन सामन्यांपैकी एका सामन्यातील पराभव त्यांना थेट घरचा रस्ता दाखवू शकतो. त्यामुळे त्यांना हा फॉर्म खेळात सातत्य राखावे लागणार आहे. त्याचबरोबर या दोन सामन्यांत विजय मिळवला. तरीही त्यांना इतर संघाच्या गणितांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
पाकिस्तानला पुढील दोन सामन्यांत अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहे. तुलनेने सोप्या असलेल्या या सामन्यांत पाकिस्तानचे पारडे जाड असले तरी बांगलादेशची या स्पर्धेतील कामगिरी पाहता पाकिस्तानसाठी हा सामना अवघड जाणार आहे. त्यामुळे इतर संघांच्या जय पराजयावर पाकिस्तानचे गणित अवलंबून आहे.

असे घडले तरच..

१)पहिल्यांदा तर पाकिस्तानला आपले दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे.

२)इंग्लड उरलेल्या दोनपैकी एका सामन्यात पराभूत झाला तर

३)बांगलादेश देखील आपल्या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात पराभूत झाला तर

४)श्रीलंका आपल्या ३ सामन्यांपैकी एका सामन्यात पराभूत झाला तर

दरम्यान, पाकिस्तान या स्पर्धेत सुमार कामगिरी करत असला तरी १९९२ च्या वर्ल्डकपमध्ये देखील पाकिस्तानचा फॉर्म आणि कामगिरी अशीच राहिली होती. त्यामुळे यावेळी देखील पाकिस्तान हि स्पर्धा जिंकेल अशी आशा पाकिस्तानचे चाहते आणि पाठीराखे व्यक्त करत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक

You might also like