’या’ 9 उपायांनी दूर ठेवा अंडरआर्म्सचं स्किन ‘इन्फेक्शन’, जाणून घ्या

उन्हात गेल्यानंतर जास्त घाम काखेत (Underarms) येतो. यामुळे येथील त्वचेवर मॉईश्चरने बॅक्टेरियांची वाढ होऊन स्किन इन्फेक्शनचा धोका वाढतो. काखेती(Underarms )ल त्वचेवर घामामुळे इन्फेक्शन झाल्यास बारिक बारिक दाणे येणे, जळजळ होणे, कपड्याचे घर्षण झाल्याने खूप आग होणे, खाज सूटणे, असे त्रास सुरू होतात. काखेतील हे स्किन इन्फेक्शन टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत, ते जाणून घेवूयात.

हे उपाय करा

1 रोज दोनवेळा अंघोळ करा. अंघोळ करत असताना अंडर आर्म्सची स्वच्छता करा.

2 डॉक्टरांचा सल्ला घेऊन क्रिम, गोळ्या अँटीबायोटीक्स घ्या.

3 खाज सूटत असेल तर खाजवू नका. कारण यामुळे इन्फेक्शन इतरत्र पसरण्याची शक्यता असते.

4 अँटी बॅक्टेरिअल क्रिममुळे त्वचेवरील खाज दूर होते.

5 भरपूर पाणी प्या.

6 हिरव्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा.

7 शक्य असल्यास सूती कपडे घाला.

8 जास्त गरमीत थांबू नका.

9 इन्फेक्शन असल्यास अँटी बॅक्टेरिअल साबण वापरा.