घामामुळं होतं अंडरआर्म्सचं स्किन इंफेक्शन ! ‘ही’ घ्या काळजी

पोलीसनामा ऑनलाइन – अनेकांना काखेत जास्त घाम येण्याची समस्या असते. काखते आलेल्या घामामुळं त्वचेवर बारीक पुळ्या येतात. या पुळ्यांवर कपड्यांचं घर्षण झालं की, आग होते. यामुळं स्किन इंफेक्शनही होतं. उन्हाळा असेल तर ही समस्या जास्त जाणवते. आज आपण यापासून बचाव करण्यासाठी काही उपाय जाणून घेणार आहोत.

खाजवल्यानंतर वाढतं इंफेक्शन
स्किन इंफेक्शनमुळं स्कीनवर जळजळ होत असेल आणि यावर तुम्ही खाजवत असाल तर यामुळं इंफेक्शन अजून वाढतं. तसंच या त्वचेवर तुम्ही खाजवल्यानंतर जर याच हातानं शरीराच्या इतर भागांना स्पर्श केला तर हे इंफेक्शन अजून वाढण्याचा धोका निर्माण होतो.

जर तुम्हाला घामामुळं घामामुळं होणाऱ्या या स्किन इंफेक्शनपासून दूर राहायचं असेल तर अंडरआर्म्सची चांगली स्वच्छता राखणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही दोन वेळा अंघोळ केली तर हाही एक उत्तम उपाय आहे.

अशी घ्या काळजी

1) अंडरआर्म्स स्वच्छ आणि कोरडे ठेवा. अंघोळ झाल्यानंतर टॉवेलनं नीट पुसून घ्या.

2) जर उन्हाळा असेल तर उन्हात जाताना सुती कपडे घालण्याचा प्रयत्न करा.

3) जास्त गरमी असेल तर अशा ठिकाणी जास्त वेळ थांबू नका.

4) जर इंफेक्शन झालं असेल तर अँटी बॅक्टेरियल साबणाचा वापर करा.

5) फंगल किंवा कोणतंही स्किन इंफेक्शन झालं असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यावर उपचार घ्या.

6) जर तुमच्याकडे अँटी बॅक्टेरियल क्रिम असेल तर यामुळंही त्वचेवरील खाज दूर होण्यास मदत होते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.