सर्वप्रथम शरीराच्या ‘या’ भागांवर दिसतात म्हातारपणाची लक्षणं ? जाणून घ्या कसं रोखायचं ते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वसाधारणपणे म्हातारपणाची लक्षणं दिसायला सुरुवात होते तेव्हा यामागे अनेक घटक कारणीभूत असतात. काही जणांमध्ये कमी वयात देखील म्हातारपणाची लक्षणं दिसून येतात. याचे कारण म्हणजे आपण दररोज घेत असलेला चुकीच्या पद्धतीचा आहार, वातावरणातील बदल आणि हर्मोन्समधील होत असलेला बदल. यामुळे तुम्ही कमी वयात देखील म्हातारे असल्यासारखे दिसू लागता. शरीराच्या काही भागांवर वय वाढीची लक्षणं दिसायला सुरुवात होते. जाणून घेऊयात शरीराच्या कोणत्या भागात वय वाढीची लक्षणं जाणवतात आणि ही लक्षणं कशी रोखायची.

स्तन आणि छातीचा भाग
रिसर्चनुसार स्त्रियांच्या छातीचा भाग, स्तनांवर वय वाढण्याची लक्षणं दिसू लागतात. कारण त्यावेळी स्तन काही प्रमाणात लुज पडायला सुरुवात होते. जर तुमच्या शरीरावर अनावश्यक चरबी असेल तर तुमच्या छातीची त्वचा अशी दिसू शकते. म्हणून जर तुम्ही तरुण वयात असताना व्यायाम करायला सुरुवात केली तर तुमची त्वचा लूज पडणार नाही.

डोळ्यांचा भाग
डोळ्याच्या आजूबाजूचा भाग 35 ते 40 वयानंतर तुमची त्वचा तारुण्यातील त्वचेपेक्षा कमी तेज असलेली दिसते. हे सगळ्यात पहिले लक्षण आहे. ज्यावेळी तुमची झोप व्यवस्थित होत नसेल तर तुम्ही पाहू शकता की तुमचा चेहरा थकलेला आहे. झोप पूर्ण न झाल्याने अशी परिस्थिती उद्भवते. यासाठी रोज 7 ते 8 तासांची झोप घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय भरपूर पाणी पिल्याने देखील त्वचेमध्ये बदल दिसून येतो.

चेहरा आणि गाल
शरीरातील इतर अवयवांपेक्षा चेहरा आणि गालावर वय वाढण्याची लक्षण जास्त प्रमाणात दिसून येतात. याची सुरवात सुरकुत्या, डाग आणि फाईन लाईन्सन होत असते. तुमच्या हावभावांवरून त्वचा लूज पडल्याचे दिसून येते. तसेच जर तुम्हाला या परिस्थितीतून स्वत:ला वाचवायचं असेल तर रोज सकाळी आणि संध्याकाळी मॉईश्चराईज लावून मगच झोपणे हे फायद्याचे ठरेल.

मान
मानेची त्वचा ही चेहऱ्याच्या त्वचेपेक्षा जास्त पातळ असते. त्यामुळे मानेवर वयवाढीची लक्षणं कमी वयात येत असतात. मानेची त्वचा लटकणे, त्वचा मऊ पडणे आणि एजिंग यांना रोखण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल व्यायाम करु शकता. व्यायाम केल्याने तुमच्या मानेवरची त्वचा लूज पडणार नाही. तसेच हातांवर देखील सुरकुत्या येण्यास सुरुवात होते. यासाठी तुम्ही खूप पाणी प्या आणि सनस्क्रिनचा वापर नियमीत करा.