Google Pay, Bhim अ‍ॅपद्वारे FASTag आता फास्टमध्ये रिचार्ज करता येणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   केंद्रीय मंत्रालयाने आज मध्यरात्रीपासून देशात फास्टॅग (Fastag) नियम अनिवार्य केला आहे. आता सर्वच वाहनांना हा नियम सक्तीचा असणार आहे. तर यामुळे मंत्रालयाच्या माहितीनुसार वाहनचालकांचा वेळ वाचणार आहे. तर आता कोणत्या कंपनीचा घेणार? रिचार्ज कसे करणार या सर्व अडचणी यापूर्वी मागे होत्या. मात्र ही अडचण दूर होणार आहे.

दरम्यान, टोल नाक्यावर फास्ट येणे-जाण्याचे माहिती नाही, परंतू तुमचा फास्टॅग आता फास्टमध्ये रिचार्ज करता येणार आहे. तसेच टोल नाक्यावरील प्रत्यक्ष परिस्थिती काही वेगळंच सांगत असली तरीही मंत्रालयाच्या दाव्यानुसार ते खरं आहे. कारण वाहनचालकांची तक्रारदेखील कोणी तिथे ऐकून घ्यायला तयार नसते. याचा अनुभव अनेकांना आला असून, यापुढेही येणार असल्याने आता तुम्हीच फास्टॅग कसा वापरायचा आणि कसा रिचार्ज करायचा याची माहिती घेऊन बुद्धिवान बनने आवश्यक बनले आहे.

तसेच, अनेक बँका फास्टॅग सुविधा देत आहेत. मात्र आता हे फास्टॅग Google Pay किंवा Bhim appद्वारे रिचार्ज करता येणार आहे. तसेच जर वाहनचालकाडे फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम नसेल तरीही ते पुढे प्रवास करू शकणार आहेत. तसेच सरकारने झीरो बॅलन्सवरदेखील प्रवास करण्याची सूट दिली आहे. यामुळे आता वाहनचालकांचे फास्टॅग रिचार्जचे टेन्शन गेले आहे.