अस्थमासारख्या गंभीर आजारावर फायदेशीर ठरतो लाल कांदा ! ‘असा’ करा वापर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – अनेकांना अस्थमाचा त्रास असतो. यात श्वासनलिका आकुंचते आणि त्यावर सूज येते. यामुळं व्यक्तीला श्वास घेण्यातही समस्या येते. अस्वस्थही वाटू लागतं. आहाराच्या मदतीनं तुम्ही यात आराम मिळवू शकता.

रोजच्या जेवणातील कांद्याचे शरीराला अनेक लाभ होत असतात. आज आपण लाल कांद्याचा अस्थमासाठी कसा फायदा होतो हे जाणून घेणर आहोत. तसेत त्याचं सेवन कसं करावं याचीही माहिती घेणार आहोत.

लाल कांद्याचे गुण
लाल कांद्यात भरपूर गुण असतात. यात अँटी ऑक्सिडेंट्स, फ्लेवेनॉएड्स आणि एंथोसियानिंस असतात. लाल कांद्यात जवळपास 25 प्रकारचे एंथोसियानिंस तत्व असतात. यातील फ्लेवोनॉएड्स या तत्त्वामुळं रक्त नैसर्गिकपणे पातळ करण्यास मदत होते. यात असणाऱ्या फायटोकेमिकलमुळं इम्युन सिस्टीमही मजबूत होते.

लाल कांद्यात व्हिटॅमिन के, बी 6, आणि सी भरपूर प्रमाणात असतं. यातील फायबरमुळं पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याशिवाय यात खनिज पदार्थ, फोलेट, थियामिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि मॅग्नीज असतात.

अस्थमासाठी लाल कांदा
कांद्यात थिओसल्फेट, क्युसरसेटिन आणि एंथोसियानिन सियानिडिन असे तत्व असतात. अनेक रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, कांद्यातील हे तत्व अँटी ऑक्सिडेंट्स म्हणून काम करतात. यामुळंच कांद्याचा अस्थमासाठी फायदा होतो. यासाठी लाल कांद्याचा वापर करणं गरजेचं आहे. यामुळं अस्थमा बरा होणार नाही परंतु तुम्हाला यात आराम मात्र नक्की मिळेल.

कांदा वापरण्याची योग्य पद्धत
एका भांड्यात ब्राऊन शुगर घ्या
ही शुगर विरघळल्यानंतर त्यात लाल कांदा कापून टाका.
आता यात पाणी टाका आणि हे मिश्रण उकळून घ्या
हे मिश्रण थंड झाल्यानंतर यात लिंबू आणि मध टाका.
आता हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या.

कसं कराल सेवन ?
जर तुम्हाला अस्थमा असेल तर आणि त्यावर तुम्हाला नियंत्रण मिळवायचं असेल तर लाल कांद्याचं हे मिश्रण रोज जेवणाआधी एक चमचा सेवन करावं. याशिवाय तुम्ही जेवणातही लाल कांद्याचा वापर करू शकता. यानं तुम्हाला अस्थमासारख्या आजारात खूप फायदा मिळेल.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.