‘हे’ 6 सोपे नियम पाळले तर अंगावर वाढलेली ‘चरबी’ नक्की होईल कमी

पोलीसनामा ऑनलाइन  – कोरोनामुळे सुरू झालेले लॉकडाऊन अजूनही पूर्णत: उठवलेले नाही. लोक अजूनही आपआपल्या घरात जास्तीत जास्त वेळ राहात आहेत. याकाळात शरीराची हालचाल कमी होत असल्याने आणि चमचमीत, वेगवेगळे पदार्थ खाल्ले जात असल्याने लठ्ठपणासारख्या समस्या अनेकांमध्ये दिसून येत आहेत. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागते. यापेक्षा जिभेवर थोडे नियंत्रण ठेवले तर काम आणखी हलकं होईल. शिवाय, थोडा व्यायामही केला पाहिजे. खासकरून पोटावरची चरबी सहजासहजी कमी होत नाही, यासाठी खुप प्रयत्न करावे लागतात. चरबी कमी करण्यासाठी काणते सोपे उपाय करावेत ते जाणून घेवूयात.

हे आवश्य करा

1 व्यवस्थीत झोप घ्या
पूर्ण झोप झाली नाही तर वजन वाढतं. झोप चांगली झाली तर पचनक्रिया चांगली राहते. अतिरिक्त फॅट बर्न होतं. सतत भूक लागत नाही. शरीरातील उर्जाही कमी होत नाही.

2 ग्रीन टी सेवन करा
दिवसभरातून किमान एक कप ग्रीन टी घ्या. यामुळे पचनक्रिया सुधारते. पोटाखालची चरबी कमी होते. शरीरातील टॉक्जीन्स निघून जातात. शरीराला उर्जा मिळते.

3 लिंबाचं सेवन

रोज सकाळी लिंबूपाणी प्यायल्याने चरबी कमी होते. पाणी कोमट असेल तर उत्तम. कच्च्या लसणामुळेही पोटाखालची चरबी कमी होऊ शकते. रक्तप्रवाहही चांगला वाहू लागेल.

4 खाण्याची वेळ निश्चित करा
खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये असलेली अनियमीतता, झोपेची कमतरता हे लठ्ठपणाचे मुख्य कारण आहे. आहारात सुखा मेवा, काकडी, गाजर, दूध, पनीर आणि अंडी यांचा समावेश करा.

5 भरपूर पाणी प्या
दिवसभरात किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर जातील. पचनशक्ती सुधारते. शरीरातील फॅट्स निघून जातील.

6 मिठ कमी करा
आहारात मिठाचे प्रमाण कमी करा. मिठातील सोडियममुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढतो. त्रिफळा खा आणि वजन कमी करा.