‘या’ बीया पोटाचा घेर कमी करण्यासाठी नक्की फायदेशीर ठरतील, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अलीकडच्या काळात मुली स्लिम राहण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. बांधा बारीक असलेल्या मुली जाड असलेल्या महिलांच्या तुलनेत दिसायला सुंदर असतात. तसेच लठ्ठ महिला स्वतःच्या वयापेक्षा जास्त मोठ्या दिसू लागलात. तर बारीक असलेल्या मुलींचं वय दिसून येत नाही. ज्या महिला जाड असतात, त्या जास्त आहार घेतात म्हणून जाड दिसतात, असे काही नसते. त्यांच्या कमरेचा आणि पोटाचा, मांड्याचा भाग हार्मोनल बदलांमुळे वाढत जात असतो. म्हणून शरीर बेढब दिसायला सुरुवात होते.

मात्र, या समस्येचा सामना करावा लागत असेल तर टेन्शन घेण्याचे काही कारण नाही. आपल्या घरातील स्वयपांक घरात असलेल्या बीयांचा आहारात सेवन करुन पोटाच्या घेऱ्यावर तुम्ही मात करु शकता. चला तर जाणून घेऊया बियांच्या साहाय्याने कसे वजन कमी करता येईल.

१. आळशीच्या बिया

आळशीच्या बीयांनी पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. यामध्ये डाएटरी फायबरर्स असतात. ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. गरोदरपणानंतर वाढलेलं पोट कमी करण्यास आळशीच्या बीयांचा आहारात समावेश करा. तसेच आरोग्यासाठी या चांगल्या असून, स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी आळशीच्या बीया फायदेशीर ठरु शकतात.

२. भोपळ्याच्या बीया

शरीरासाठी लाभदायक असलेल्या भोपळ्यांच्या बीयांचा आहारात समावेश करा. या बीयांच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मेटॅबॉलिझम फास्ट करण्यासोबतच भोपळ्याच्या बीया वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरत असतात.

३. तिळ

वजन कमी करण्यासाठी तिळाचे सेवन केले जाते. यामध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. त्यामुळे तुमचे कॉलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते. तिळाच्या सेवनाने पोटाच्या समस्या दूर होतात. पोट साफ न होण्याची समस्या असेल तर तिळाचे सेवन गुणकारक ठरते.

४. तुळशीच्या बीया

तुळशीच्या बीयांच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत मिळते. तसेच पाचनक्रिया सुरळीत होते. तुळशीच्या बीयांमध्ये एंटी ऑक्सिडेंट्स असतात. जे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.