डोळ्यांखालील काळी वर्तुळं किंवा सूज कमी करण्यासाठी वापरा ‘हे’ 5 घरगुती सोपे उपाय !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  झोप कमी झाल्यानं किंवा इतर काही कारणांमुळंही डोळे सूजतात. यामुळं चेहरा अजिबात चांगला दिसत नाही. आपण आता डोळ्यांच्या काही इतर समस्या जसे की डार्क सर्कल, डोळे लाल होणं आणि डोळ्यांना सूज येणं यावर काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1)  आल्याचा रस – डोळ्यांसाठी तुम्हाला जर कॉफी मास्क तयार करायचा असेल तर कॉफी आणि आल्याचा रस एकत्र करा. ही पेस्ट तुम्ही मेकअप रिमुव्हर म्हणूनही वापरू शकता. आल्याच्या रसात तुम्ही फेसवाईप्स किंवा कापूस घालून डोळ्यांना लावा.

2)  काकडी किंवा त्याचा रस – शक्य असेल तर काकडीचा रस डोळ्यांना लावा. तुम्ही काकडी कापून त्याचे गोल गोल तुकडेही डोळ्यांवर ठेवू शकता. यान थकवा जातो डोळ्यांना शांतता मिळते.

3)  बटाटा – डोळ्यांच्या खाली काळे डाग असतील तर बटाटा कापा. त्याच्या आतल्या भागानं डोळ्यांच्या खाली मसाज करा. ताज्या बटाट्याचा रसानंही तुम्ही मसाज करू शकता. यामुळं काळी वर्तुळं जातात आणि डोळे चांगले राहतात. नियमितपणे याचा वापर केल्यास फायदा होतो.

4)  दूध – डोळे लाल झाले असतील तर पातळ दुधात कापड किंवा कापूस भिजवून त्याच्या घड्या करून बंद डोळ्यांवर ठेवा. यानं आराम मिळेल.

5)  आहार – डोळ्यांना आवश्यक ते पोषक घटक देण्यासाठी तुम्ही योग्य आहार घ्यायला हवा. गाजर हा उत्तम पर्याय आहे. यातील अ जीवनसत्वामुळं डोळ्यांना अनेक पोषक घटक मिळतात.