अंडरआर्म्सच्या काळेपणानं वैतागलात ? जाणून घ्या ‘हे’ 3 घरगुती सोपे उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकांना डार्क अंडरआर्म्सची समस्या असते. खास करून महिलांना. स्लीव्हलेस ड्रेस किंवा काखेतील केस काढण्यासाठी रेजरचा वापर करणं यामुळं ही समस्या येते. यावर आज आपण काही घरगुती सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

1) लिंबू – अंघोळीच्या 10 मिनिट आधी लिंबाच्या फोडी घेऊन यानं 5 मिनिटे अंडरआर्म्सला मसाज करा. यानंतर स्वच्छ अंघोळ करा. नंतर या भागाला बॉडी लोशन लावा. यात असणाऱ्या सायट्रिक अॅसिडमुळं त्वचेतील मेलॅनिन कमी होतं आणि स्किन फेअर होते. रोज दोन आठवडे हा प्रयोग करा.

2) कच्चा बटाटा – यासाठी एक बटाटा घ्या तो कापून अंडरआर्म्सला मसाज करा. किंवा याचा रसही तुम्ही वापरू शकता. रोज हा प्रयोग केला तर फरक दिसेल.

3) अलोवेरा – अ‍ॅलोवेरा किंवा जेल लावून अंडरआर्म्सला मसाज करा. यातील व्हिटॅमिन ईचा खूप फायदा होतो. याशिवाय त्यातील पाण्यामुळं त्वचा हायड्रेट राहते. इतकंच नाही तर अ‍ॅलोवेरामुळं त्वचेची इलास्टीसिटी सुधारते. यामुळं फाईन लाईन्स, सुरकुत्या आणि चेहऱ्यावरील डाग अशा समस्या दूर होतात. म्हणूनच अनेक ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये याचा वापर केलेला असतो.