प्रायव्हेट पार्ट्सला काळेपणा आलाय ? करा ‘हे’ 4 सोपे घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पुरुष असो किंवा महिला अनेकदा त्यांना प्रायव्हेट पार्ट काळे पडण्याची समस्या उद्भवते. विशेष करून काख, मांड्या आणि व्हजायना असे शरीरातील काही नाजूक भाग जास्त काळे वाटतात. याचीही अनेक कारणं आहेत. उष्णता, बदलते वातावरण आणि सतत येणारा घाम यामुळं शरीराची त्वचा काळी पडते. काहींना इंफेक्शन झाल्यानंतर त्वचेला येणाऱ्या खाजेमुळंही त्वचा काळी पडण्याची समस्या उद्भवते. जर तुम्हालादेखील ही समस्या आली असेल तर यासाठी आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

खास बात अशी की, हे उपाय करणं खूप सोपं देखील आहे. यासाठी तुम्हाला जास्त खर्चही करावा लागणार नाही. कोणतेही केमिकल न वापरता तुम्ही काळेपासासून सुटका मिळवाल. आम्ही जे उपाय सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला जास्त वेळही खर्च करावा लागणार नाही. फक्त तुम्ही याच्या वापरात सातत्य ठेवायला हवं. तरच तुम्हाला फरक दिसणार आहे.

1) लिंबू – अनेकदा महिलाचे प्रायव्हेट पार्ट्स त्यांच्या इतर अवयवांपेक्षा जास्त काळे दिसू लागतात. अनेक महिला या समस्येनं त्रस्त असतात. यासाठी अर्ध लिंबू कापून घ्या. लिंबू पिळून त्यातील रस काढून टाका. आता लिंबाची उरलेली साल घ्या. ही साल मधात बुडवून काळ्या भागावर मसाज करा. सलग 2 आठवडे हा प्रयोग केल्यास त्वचेचा काळेपणा दूर होता.

2) चंदन पावडर – चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी आणि लिंबाचा रस घाला. आता हे मिश्रण एकत्र करून काळ्या झालेल्या भागावर लावा. 10 मिनिटे ठेवल्यानंतर पाण्यानं धुवून स्वच्छ करा. यामुळं त्वचेचा काळेपणा निघून जाईल.

3) कोरफड – कोरफडीत अनेक औषधी गुणधर्म असतात. काळ्या पडलेल्या त्वचेवर जर कोरफडीचा रस लावला तर नक्कीच फायदा मिळेल.

4) हळद – हळद आणि दूध गरजेनुसार घेऊन एकत्र करा. आता हे मिश्रण काळ्या पडलेल्या त्वचेवर लावा. सुकल्यानंतर पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या. सलग 2 आठवडे जर हा प्रयोग केला तर तुम्हाला फरक दिसून येईल.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.