Holi 2021 : तासभर साबण घासण्याची गरज नाही, होळीचा रंग फक्त 5 मिनिटात घालवा; जाणून घ्या ‘कसे’

नवी दिल्ली: मुले असो मोठी माणसं सर्वांना होळी खेळायला आवडते. हा उत्सव रंग आणि पिचकारीशिवाय अपूर्ण वाटतो म्हणून रंगांसह होळी खेळण्याची स्वतःची वेगळीच मज्जा असते. होळी खेळत असताना कोणीही स्वतःच्या त्वचेची काळजी घेत नाही, पण होळीनंतर चेहऱ्यावरील रंग काढून टाकणे हे एक मोठे आव्हान बनते. तासभर साबण चोळल्यानंतरही होळीचा रंग सुटत नाही. चला तर मग यावर घरगुती उपाय पाहुयात ज्यामुळे होळीमुळे आलेले रंग निघून जातील.

होळी खेळण्यापूर्वी संपूर्ण शरीराला तेल अथवा व्हॅसलिन लावा. हे आपल्या त्वचेला आवश्यक आद्रता आणि संरक्षण प्रदान करतात. त्यामुळे होळीचा रंग शरीरावर राहू शकत नाही आणि अंघोळ करताना काही मिनिटांतच ते निघून जातील.

जर एखाद्याच्या चेहऱ्यावर रंग जास्त आला असेल तर हरभरा पीठ, दही, मध आणि थोडे नारळ तेल मिसळून त्याची पेस्ट बनवा. अंघोळ करताना ही पेस्ट संपूर्ण शरीरावर लावून मालिश करा आणि नंतर कोमट पाण्याने अंघोळ करा, असे केल्याने आपले सौंदर्य परत येईल.

त्वचेवरील होळीचा रंग घालविण्यासाठी हरभरा पीठात गुलाब पाणी, कोरफड, कच्चे दूध मिसळून एक पेस्ट तयार करा. १०-१५ मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर आपला चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील रंग निघून जाईल.

फळांचा फेस पॅक लावल्याने होळीचा रंग निघून जातो. त्यासाठी पपई, केळी अथवा किवी मॅश करून त्याची पेस्ट बनवा, मग ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. असे केल्याने चेहऱ्यावरील जळजळ कमी होईल आणि त्यामुळे चेहरा थंड होईल.

मुलतानी मिट्टी, गुलाब पाणी, दही आणि मध यांची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास कोरडी त्वचा मुलायम होते आणि त्वचेत ओलावा टिकून राहतो.