ओठांच्या भोवतीच्या ‘मंकी पॅचेस’साठी आणि त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी 4 सोपे घरगुती उपाय !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकजण असे आहेत ज्यांच्या ओठांच्या भोवतीची त्वचा काळी पडलेली असते. याशिवाय काहींना ओठांभोवती आलेल्या पिंपल्समुळं डागही पडतात. या डागांन किंवा खराब डाग असलेल्या त्वचेला मंकी पॅच म्हणतात. अनेकदा हनुवटीवरही असे डाग असतात. यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊयात.

1) लिंबाचा रस – लिंबू त्वचेचासाठी एक नैसर्गिक ब्लीच आहे. लिंबाचा रस प्रभावित जागेवर लावा आणि 10 ते 15 मिनिटांनी चेहारा धुवून टाका. एका आठवड्यातच तुम्हाला फरक दिसेल.

2) हळद – पिग्मेंटेशनसाठी याची खूप मदत होते. दह्यात हळद मिसळून हे मिश्रण चेहऱ्याला लावावं. हा उपाय नियमित केल्यास लगेच फरक जाणवतो. त्वचेचा काळवटपणा यानं लगेच दूर होतो.

3) बेकिंग सोडा – बेकिंग सोडा गरजेनुसार घ्या. त्यात तीन चमचे पाणी मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्याला किंवा डाग असतील तिथं लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवून टाका. एक आवठडा हा प्रयोग केल्यास लगेच फरक जाणवेल.

4) चंदन पावडर – दूध आणि दही मिक्स करून यात गरजेनुसार चंदन पावडर घाला. तयार मिश्रण डाग असणाऱ्या ठिकाणी किंवा चेहऱ्याला लावा. हा पॅक सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका. यानेही त्वचेचा काळेपणा किंवा डाग दूर होतात.