पार्लरचा खर्च वाचवून ‘हे’ 4 सोपे उपाय करून घरच्या घरीच काढा नको असलेले केस ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  सध्या लॉकडाऊनमध्ये सारं काही बंद आहे. सर्वांना ठराविक दिवसानंतर पार्लरला जावंच लागतं. परंतु तुम्हाला पार्लरला जायला जमत नसेल तर चिंता करू नका. आज आपण शरीरावरील किंवा चेहऱ्यावरील नको असलेले केस तुम्ही घरच्या घरी कसे काढून शकता हे जाणून घेणार आहोत.

1) तुरटी आणि गुलाब पाणी – हे मिश्रण तयार करण्यासाठी पुढीलप्रमाणे कृती करावी.

– एका वाटीत 2 चमचे गुलाब पाणी घ्या.
– यात अर्धा चमचा तुरटी पावडर टाका.
– मिश्रण नीट एकत्र झाल्यानंतर हे कापसाच्या मदतीनं त्वचेवर लावा.
– 20 मिनिटांनी कोमट पाण्यानं चेहरा धुवून टाका.

2) बेसन आणि हळद – यामुळं चेहऱ्यावरील नको असलेले केस जातात आणि चेहरा चमकदार बनतो. पुढीलप्रमाणे कृती करा.

– एका वाटीत अर्धा कप किंवा गरजेनुसार बेसन घ्या.
– यात अर्धा कप किंवा गरजेनुसार थंड दूध मिक्स करा.
– एक चमचा हळद यात मिक्स करा.
– हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.
– 20 मिनिटांनी हे सुकल्यानंतर आधी हातानंच साफ करा.
– किंवा तुम्ही थेट पाण्यानंही धुवून काढू शकता.
– आठवड्यातून किमान 2 वेळा याचा वापर करावा. जास्त फायदा मिळेल.

3) अंड आणि पांढरा भाग – यासाठी पुढील प्रमाणे कृती करा.

– अंड फोडून त्यातील सफेद भाग एका वाटीत काढा.
– यात एक चमचा साखर आणि अर्धा चमचा मक्याचं पीठ मिसळा.
– हे मिश्रण एखाद्या ब्रशच्या मदतीनं चेहऱ्यावर केस असणाऱ्या ठिकाणी लावा.
– 10 ते 20 मिनिटांनी हे मिश्रण सुकल्यानंतर एखाद्या रफ कापडानं चेहारा साफ करा.
– यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवून टाका.

4) हेअर रिमुव्हर क्रीम – या क्रीमनं शरीरावरील कोणत्याही भागावरील केस काढता येतात. यासाठी पुढीलप्रााणे कृती करा.

– ज्या भागावरील केस काढायचे आहेत त्यावर या क्रीमचा पातळ थर लावा
– यानंतर ठराविक वेळेनं किंवा सुकल्यानंतर एका ओल्या कापडानं क्रीम लावलेला भाग खालून वरच्या दिशेनं पुसून काढा.
– यानंतर तो भाग पाण्यानं धुवून स्वच्छ करा.