अप्पर लिप्स हेअर्सनं त्रस्त आहात ? जाणून घ्या ‘हे’ 4 सोपे घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   फेशियल हेअर खास करून अप्पर लिप्स हेअर्सला सर्वच मुलींची डोकेदुखी आहे. या केसांची ग्रोथही लवकर होत असते. त्यामुळं सतत मुलींना पार्लरला जावं लागतं आणि खर्चही करावा लागतो. आज आपण याासाठी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत जेणकरून तुम्ही सहज हे केस काढू शकाल आणि याची ग्रोथही कमी करता येईल.

1) हळद आणि दूध – एक चमचा हळद आणि एक चमचा दूध एकत्र करा. ही पेस्ट अप्पर लिप्सला लावा. 20 मिनिटांनंतर सुकल्यानंतर रब करून थंड पाण्याच्या मदतीनं हे काढून टाका. रब करताना केसांची ग्रोथ ज्या दिशेनं होते त्याच्या विरुद्ध दिशेनं रब करा.

2) एग व्हाईट – एका बाऊलमध्ये अंड्याचा पांढरा भाग काढून घ्या. यात मक्याचं पीठ आणि एक चमचा साखर एकत्र करा. तुम्ही यासाठी पिठीसाखरही वापरू शकता. ही पेस्ट अपर लिप्सवर लावा. ही पेस्ट सुकल्यानंतर हेअर ग्रोथ होत असलेल्या विरूद्ध दिशेनं खेचून काढा. नंतर चेहरा थंडा पाण्यानं धुवून घ्या.

3) जिलेटीन – एका बाऊलमध्ये एक चमचा जिलेटीन घ्या. दोन चमचे दूध आणि तीन थेंब लेवेंडर ऑईल यात एकत्र करा. हे मायक्रोवेव्हमध्ये 12 सेकंदासाठी ठेवा. गरम झाल्यानंतर ही पेस्ट तयार हेईल. आता ही पेस्ट अप्पर लिप्सरवर लावा. सुकल्यानंतर हे काढून टाका आणि चेहरा थंड पाण्यानं धुवून घ्या.

4) पुदीन्याचा चहा – रिसर्चमध्ये हे सिद्ध झालंय की, पुदीन्याचा चहा चेहऱ्यावरी केसांची ग्रोथ कंट्रोल करतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ टाळावेत.