असं पाहा ‘गुपचूप’ दुसऱ्यांचं WhatsApp स्टेट्स !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या नव्या पॉलिसीमुळे व्हॉट्सअ‍ॅप जास्त चर्चेत आलं आहे. २०१८ मध्ये व्हॉट्सअ‍ॅपने आणलेल्या स्टेटस फीचरमुळे युजर्स फोटो आणि व्हिडीओ स्टेटसला ठेवू शकतात. एकदा स्टेट्स ठेवल्या नंतर ते २४ तासांसाठी दिसतं. त्यानंतर ते आपोआप निघून जातं. आपलं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस कोणी कोणी पाहिलं हे युजरला सीनमध्ये दिसतं. मात्र, अनेकदा एखाद्या व्यक्तीचं स्टेटस पाहिल्यानंतर ते त्या व्यक्तीला समजायला नको अशी इच्छा असते. युजर्सची हीच इच्छा व्हॉट्सअ‍ॅपने पूर्ण केली आहे. त्यासाठी आपणाला काही स्ट्रिक्स चा वापर करायचा आहे. तसे केल्यास कॉन्टॅक्ट लिस्टमधील कोणत्याही युजरचं स्टेटस लपून छपून पाहता येतं. तसेच त्या व्यक्तीला आपण स्टेटस पाहिलं हे माहितीही पडणार नाही. तर चला पाहूया काय आहे.

सर्वप्रथम अँड्रॉईड किंवा आयफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. त्यानंतर तुमचं अकाऊंट ओपन करा आणि प्रायव्हसीवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला रीड रिसिप्टचा एक ऑप्शन दिसेल. आता तो ऑप्शन डिसेबल करा. ऑप्शन डिसेबल केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ब्लू टिकचा ऑप्शन देखील बंद होईल. हा ऑप्शन बंद झाल्यानंतर तुम्हाला कोणताही मेसेज आला असेल तर तुम्हाला समजेल मात्र तुम्ही तो मेसेज वाचला की नाही, हे समोरच्या व्यक्तीला माहिती पडणार नाही. याचाच अर्थ तुम्ही कोणाचेही मेसेज वाचू शकता पण त्याला कळणार नाही की तुम्ही त्याचे मेसेज वाचले आहेत की नाही. याच पद्धतीने या ऑप्शनला डिसेबल केल्यानंतर युजर्सचे स्टेट्स पाहिल्यानंतर त्यांना तुम्ही त्यांचे स्टेट्स पाहिले की नाही हे समजणार नाही. तसेच तुमचं नाव सुद्धा सीन लिस्टमध्ये दिसणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

WhatsApp अकाऊंट डिलीट केल्यानंतरही ९० दिवसांपर्यंत धोका
व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीबाबत युजर्समध्ये नाराजी पसरली आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोक मोठ्या प्रमाणात या नव्या पॉलिसीचा विरोध करताना पाहायला मिळत आहे. आता तर व्हॉट्सअ‍ॅपसंबंधित नवीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं अकाऊंट डिलीट केल्यानंतरही ९० दिवसांपर्यंत धोका असून चॅट लीक होऊ शकत असल्याची माहिती मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने आपली नवी प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली असून ती आठ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. अनेकांनी तर या नव्या पॉलिसीचा धसका घेतला आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे युजर्स आपला डेटा प्रायव्हेट ठेऊ इच्छित असल्यास, त्यांना अ‍ॅप अनइन्स्टॉल नाही, तर डिलीट करावं लागेल. जर अकाऊंट डिलीट केलं नाही, तर डेटा व्हॉट्सअ‍ॅपकडे राहील. तसेच अकाऊंट डिलीट केल्यानंतरही ९० दिवसांपर्यंत युजर्सचा डेटा व्हॉट्सअ‍ॅपकडे राहतो. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे युजर्स, दुसऱ्या मेसेजिंग अ‍ॅपकडे स्विच होत आहेत. त्यामुळे अनेकजण आपल्या फोनमधून व्हॉट्सअ‍ॅप थेट अनइन्स्टॉल करत आहेत. मात्र हा योग्य पर्याय नाही. दुसऱ्या अ‍ॅपवर स्विच होताना व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट डिलीट करणं आवश्यक आहे. अँड्रॉईड युजर्सला व्हॉट्सअ‍ॅपचे अकाउंट डिलीट करण्यासाठी मेन स्क्रिनवर बाजूला दिलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर सेटिंग्समध्ये अकाऊंट ओपन करुन डिलीट माय अकाउंटवर क्लिक करावं. फोन नंबर टाकावा लागेल आणि नंतर डिलीट माय अकाऊंटवर क्लिक करावं लागेल. यावेळी अकाऊंट डिलीट करण्याचं कारण विचारलं जाईल. यात कारण सांगून पुढील प्रोसेस होईल. मात्र अकाऊंट डिलीट झाल्यानंतरही ९० दिवसांपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपकडे युजर्सचा डेटा राहतो. हे देखील ध्यानात घ्यावे लागेल.