काकांनी खेळला असा काही ‘डाव’ की पुतण्याचाही उतरला ‘भाव’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात रात्रीत सत्तास्थापन झाले आहे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली परंतू सर्वोच्च न्यायालयने बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिल्यानंतर शरद पवारांसमोर पुतण्या अजित पवार यांना देखील आपला हट्ट सोडावा लागला आणि उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बहुमत नसल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता महाविकासआघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग रिकामा झाला.

त्यानंतर चर्चा सुरु झाली की काकांनी नक्की अजित पवारांचा हा बंड कसा मोडीत काढला. कसे अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांना पुन्हा आपल्या गटात आणून अजित पवारांना लोटांगण घालायला लावलं. जेव्हा अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर शरद पवारांनी तात्काळ ट्विट करत पक्षाची बाजू मांडली आणि स्पष्ट केले की अजित पवार यांच्या निर्णयाला आमचा पाठिंबा नाही. त्यांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती.

50 वर्षांचा राजकीय अनुभव असलेल्या शरद पवारांनी फक्त 24 तासात आपल्या आमदारांना पुन्हा एकदा एकजूट केले. आपल्या आमदारांना शोधून काढले. भाजपच्या विरोधात मोर्चा उघडून शरद पवार यांनी दिल्ली, गुरुग्राममधून आल्या आमदारांना ढुडाळून आणले. दिल्लीपासून मुंबई पर्यंत आपल्या गायब आमदारांचा ढुडाळा घेऊन दुसऱ्या दिवशीच आपल्या आमदारांना शपथ दिली आणि अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार नाही याची काळजी घेतली.

राष्ट्रवादीच्या ज्या गायब आमदारांना मुंबईतून विमानाने दिल्लीत नेण्यात आले होते त्यातील एक आमदार होते दौलत दरोडा. त्यांनी सांगितले की त्यांना हे सांगून दिल्लीत आणण्यात आले की राष्ट्रवादीने आधिकृतपणे भाजपला समर्थन देण्यात आले. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या एका हॉटेलमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये ठेवण्यात आले आणि त्यांचे फोन देखील काढून घेतले. त्यानंतर शरद पवारांनी त्यांना आपल्या संपर्काच्या बळावर तेथून बाहेर काढले.

तर राष्ट्रवादीच्या एका आमदाराला म्हणजेच संजय बनसोडे यांना शिवसैनिकांनी विमानतळावरुन पकडून वायबी चव्हाण सेंटरला आणले जेथे तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरु होती. शिवसैनिकांनी सांगितले की बनसोडे यांना पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांच्या सुरक्षेत एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेथे पहिल्यांदा एकनाथ शिंदे पोहचले आणि पोलिसांचा गराडा पाहून त्यांनी शिवसैनिकांना बोलावले आणि राष्ट्रवादीच्या आमदाराला नेण्यात आले. यादरम्यान पोलीस आणि भाजप नेत्यांची वाद झाला होता.

या प्रकारे शरद पवार यांनी आपल्या राजकीय कौशल्याच्या जोरावर आणि नेतृत्व क्षमतेवर जवळपास 15 आमदारांना शोधून काढले आणि आपला पक्ष पुन्हा एकजूट केला.

Visit : Policenama.com