केस गळी थांबवायचीय तर मग ‘हा’ प्रयोग नक्की करा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेक महिला आणि पुरुषांना अकाली केस गळण्यामुळे टक्कल पडलेलं असत. केस अकाली गळल्यामुळे आत्मविश्वासाची कमतरता जाणवते. तसेच बहुतांश जण पडलेलं टक्कल कस काळ्याभोर केसांनी झाकता येईल याचा विचार करत असतात. तसेच महागड्या क्रिम्स आणि ट्रिटमेंट्स घेऊन सुद्धा केसांवर काही फरक पडत नसतो. जर तुम्हाला देखील याच समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही काही घरगुती उपायांचा वापर करुन सुंदर केस मिळवू शकता. तर मग जाणून घेऊद्या घरगुती वापरात असलेल्या कोणत्या पदार्थांमुळे तुमची केस गळण्याची समस्या दूर होईल.

थंडीच्या वातावरणात शरीराला उष्णता मिळण्यासाठी मेथीचे सेवन केले जाते. तसेच घरात मेथीचे लाडू तयार करतात. कारण मेथीच्या लाडूच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळत असतात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का मेथीचा वापर केसांसाठी सुद्धा केला जातो. केसांवर मेथीचा वापर केल्यास केस गळण्याची समस्या दूर होते. मेथीचे सौंदर्य प्रसाधनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

टक्कल पडलेल्या भागावर केस येण्यासाठी मेथीचे सेवन फायदेशीर ठरत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटिन्स असतात. तसेच यात असलेल्या पोटॅशियम मुळे केस पांढरे होण्यापासून वाचतात. त्यासाठी तुम्हाला मेथीच्या पानांना नारळाच्या दुधात मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करुन घ्या. नंतर ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा. हा प्रयोग केल्यास केस गळण्याची समस्या दूर होईल. केसांवर जर तुम्ही मेथीचा वापर केलात तर कोणत्याही केमिकल्सच्या वापराशिवाय सुंदर केस मिळवू शकता. याकरिता मेथीची पावडर करुन घ्या. या पावडरमध्ये नारळाचं तेल आणि ऑलिव्ह ऑइल घाला. या मिश्रणाची पेस्ट करुन केसांना लावल्यास फरक दिसून येईल. केसांमध्ये फोड येण्याची समस्या निर्माण होत असेल तर मेथीच्या पावडरमध्ये दही घालून केसांना लावा.

तसेच केसांच्या वाढीसाठी मेथीचा वापर लाभदायक असतो. त्यासाठी मेथीचे काही दाणे पाण्यात २४ तास भिजवून ठेवा. नंतर २४ तासांनी ते पाणी काढून मेथी वेगळी काढा. मग ते पाणी केसांना लावून तीन तास तसेच ठेवा. त्यानंतर केस कोमट पाण्याने धुवून टाका.