पंचेवीस ते 35 वयोगटातील तरूण होतायेत ‘या’ गंभीर आजाराचे शिकार, जाणून घ्या ‘ही’ 10 कारणे, अशी घ्या काळजी, वेळीच व्हाय सावध

पोलीसनामा ऑनलाइन  – पूर्वी असे काही आजार होते जे केवळ वयोवृद्धांमध्येच दिसून येत असत. परंतु, अलिकडच्या काळात हे आजार तरूणांमध्ये दिसून लागले आहेत. भारतातच नव्हे, तर ही समस्या संपूर्ण जगाला सतावत आहे. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब हे ते गंभीर आजार होय. बदललेली जीवनशैली यासाठी तरूणांना घातक ठरत आहे. मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणार्‍या सर्वाधिक तरूणांमध्ये ही समस्या दिसते. मुंबई, दिल्लीसारख्या शहरात हे आजार जास्त आहेत. धक्कादायक म्हणजे 25 ते 25 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये आता रक्तदाबाच्या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. यामागील कारणे आणि कोणती काळजी घ्यावी, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

ही आहेत कारणे

1 खाण्यापिण्याच्या बिघडलेल्या सवयी
2 व्यायामाचा अभाव
3 मोबाईलचा अतिवापर
4 अपुरी झोप
5 हाय कॅलरी फूड, शारीरिक हालचालींचा अभाव
6 वाढता लठ्ठपणा
7 जास्त तेलयुक्त आणि फॅट्स असणारे खाणे
8 सतत बसून काम करण्याची नोकरी
9 चहा किंवा कॉफीचे जास्त सेवन
10 गोड पदार्थांचे जास्त सेवन

अशी घ्या काळजी
1 फिजीकल अ‍ॅक्टीव्हीटी करण्यासाठी योगा किंवा जीमला जा.
2 शारीरीक समस्या जाणवत असतीस तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
3 आहारतज्ञांना किंवा डॉक्टरला भेटून डाएट प्लॅन करा.
4 स्वतःला फिट ठेवा.