खुलासा ! अमेरिकेची गुप्तचर एजन्सी CIA नं 50 वर्षापर्यंत केली ‘भारत-पाक’सह जगातील तब्बल 120 देशांची ‘रेकी’

सर्वात मोठ्या मिशनचा DNA टेस्ट ! सुरक्षित नाहीत इलेक्ट्रिक उपकरणे आणि तुमचे फोन,डेटा होऊ शकतो चोरी

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – सध्या आधुनिक काळात युद्ध ही शस्त्राने नाही तर तंत्रज्ञाने लढली जात आहेत. अशा लढायांमध्ये गुप्तचर आणि नवीन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे. असेच युद्ध अमेरिकेला सुरु केले होते. ज्यामध्ये अमेरिकेने 50 वर्षे 120 देशांची जासूसी केली आणि त्यांना याबाबतची खबर देखील होऊन  दिली नाही. CIA मार्फत केल्या गेलेल्या कारवाईमुळे अमेरिकेने अनेक देशांचा माग काढला आणि कित्तेक युद्धे तर कोणत्याही प्रकारचा हल्ला न करता जिंकली असावी असे सांगितले जात आहे.

स्विझर्लंडच्या Crypto AG या कंपनीने जाजूसी करण्याचे तंत्रज्ञान बनवले होते. 1951 मध्ये अमेरिकेने आणि जर्मनीने या कंपन्यांसोबत एक करार केला आणि 1970 च्या दशकात या कंपनीलाच खरेदी केले. यानंतर कंपनीतीने सर्व उपकरणे अमेरिकेला विकली आणि छेडछाड केलेली उपकरणे इतर देशांना विकली ज्यामध्ये भारताचा देखील समावेश होता.

या जासूसूसीच्या उपकरणांद्वारे दोन जनांमधील संभाषण किंवा लिखित मजकूर / कोणत्याही प्रकारचा संदेश इतर कोणालाही समजत नव्हता तो फक्त ती उपकरणे हाताळणाऱ्यालाच समजत असे. त्यानंतर अनेक देशांनी यावर विश्वास ठेवून संभाषण केले मात्र हा देशांनसोबत धोका झाला आणि असे करून Crypto AG ने करोडो डॉलरची कमाई केली. CIA ने त्याच पैशांचा वापर करून जासूसी करणाऱ्या इतर कंपन्या खरेदी केल्या. जेणेकरून बाजारात Crypto AG कायम उच्चस्थानी राहील.

5 दशक सुरु होते जासूसीचे ऑपरेशन
1970 ते 2018 म्हणजेच तब्बल पाच दशके जासूसीचे हे ऑपरेशन सुरु होते. मात्र अद्याप हे स्पष्ट झालेली नाही की यामध्ये भारताची कशी आणि किती जासूसी करण्यात आली आणि भारत सरकारने देखील अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

2018 मध्ये दहा देशांहून अधिक देश या तंत्रज्ञानाचा वापर करत होते नंतर CIA ने कंपनी विकून टाकली आणि नवीन कंपनीची सुरुवात केली. त्यामुळे हे जासूसू प्रकरण अद्याप संपलेले नाही असेच म्हणता येईल.

इंग्रजी वृत्तपत्राने केला खुलासा
अमेरिकेतील एका नामी वृत्तपत्राने याबाबत खुलासा केला आहे. CIA च्या जासूसीमुळेच चीनमधील एक टेलिकम्युनिकेशन कंपनी (HUAWEI ) ला अमेरिकेने बॅन केले होते. यामुळे भारताचे किती नुकसान झाले यासाठी यासंबंधी सुरक्षा रक्षकाकाकडून माहिती मिळवण्यात आली.

त्यामुळे आता आगामी काळातील युद्ध हे एकमेकांवर बॉम्ब हल्ले करून नाही तर एकमेकांची खाजगी माहिती चोरून केले जाणार आहे. CIA अनेक डिजिटल हत्यार बनवण्याच्या मागे लागले आहे.

CIA ने 2017 मध्ये मोबाईल हॅक करणारे सॉफ्टवेअर बनवले
2017 मध्ये काही लीक झालेल्या माहितीच्या आधारे समजले की, CIA ने मोबाईल आणि टीव्ही हॅक करण्याचे सॉफ्टवेअर बनवले होते. या सर्वांच्या मार्फत CIA तुमच्यावर सहजतेने नजर ठेवू शकते आणि तुम्हाला याबाबत समजणार देखील नाही. अशाच प्रकारच्या आणखी पाचशे प्रोजेक्टवर CIA काम करत आहे.

इलेकट्रोनिक गॅजेट किंवा मोबाईल फोन पूर्णपणे सुरक्षित नाही
इलेकट्रीक गॅजेट आणि मोबाईल फोन सध्या सुरक्षित नाहीत कारण यावरून कोणीही तुमच्यावर सहजतेने नजर ठेवू शकते. एवढेच नाही तर तुमच्या फोनमधील तुमचा खाजगी डेटा देखील विकू शकतात. किंवा इंटरनेट सारख्या ठिकाणी तुमची माहिती व्हायरल होऊ शकते. तसेच फोनमध्ये बँकेची माहिती असेल तर ते देखील खूप रिस्की ठरू शकते.

जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या जेफ बेजोस या व्यक्तीची खाजगी माहिती त्याचा फोन हॅक करून मिळवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. इजरायल मधील एका संस्थेने हे काम केले होते. Pegasus च्या मदतीने तुमच्या फोनमधील प्रत्येक गोष्टींवर कंट्रोल मिळवता येते आणि फोन वारणाऱ्यांना याची माहिती देखील मिळत नाही.