२६ वर्षांच्या तरूणाने ४ महिन्यात कमी केले ३० किलो वजन

पोलीसनामा ऑनलाईन टीम – एका २६ वर्षीय तरूणाच वजन तब्बल १२४ किलो होते. एकदा खेळत असलेल्या मुलांनी त्याच्याकडे गेलेला बॉल परत मागताना अंकल बॉल द्या, असे म्हटले. मुलांनी त्यास अंकल म्हटल्याने तो विचारात पडला आणि त्याचवेळी त्याने वजन कमी करण्याचा निश्चय केला. जिद्दीने त्याने केवळ ४ महिन्यात त्याने ३० किलो वजन कमी केले. या तरूणाने सकारात्मक विचार आणि संपूर्ण डेडिकेशनने आपले लक्ष्य गाठले. वजन कमी करण्याचा प्रवास अविस्मरणीय असल्याचे तो म्हणतो.

या तरूणाने कोणता आहार घेतला ते आपण आधी पाहुयात. त्याने ब्रेकफास्टमध्ये ५ अंड्यांची भुर्जी, १० एमएल कोकोनट ऑइल, सीताफळ आणि व्ही प्रोटीन शेक घेतले. लंचमध्ये बॉइल्ड फिश, चिकन आणि १० एमएल ऑलिव्ह ऑइल, तूप आणि १०० ग्रॅम दही खाल्ले. संध्याकाळी स्नॅक्समध्ये पीनट, काकडी आणि गाजर, बदाम घेतले. डिनरमध्ये चिकन, पनीर, फिश, दोन काकड्या, दोन गाजर आणि पालक असा आहार घेतला. आठवड्यातून एकदाच आईस्क्रीम, पिझ्झा तो खात होता.

महत्वाचे म्हणजे तो नियमित व्यायामही करत होता. तो दररोज दोन तास व्यायाम करत होता. दीड तास वजन कमी करण्याच्या प्रशिक्षण घेत होता. ३० मिनिट कार्डिओ आणि १५ मिनिट एचआयआयटी व्यायाम करत होता. त्याने फिश, अंड्याची भुर्जी आणि दही खाणे कधीही सोडले नाही. तो आरशासमोर उभे राहून स्वतःला मोटिव्हेट करत होता. तो वर्कआऊट आणि डायट चेंज करत राहिला. यामुळे त्याला कंटाळा आला नाही.

आरोग्य विषयक वृत्त –

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

केसांच्या समस्या समूळ नष्ट करा ; ‘हे’ आहेत उपाय

‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही