Mutual Fund : वारसदाराचं नाव बदलायचंय ? Follow करा ‘ही’ सोपी प्रक्रिया !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या बँकेतील संपत्ती ही त्याच्या वारसदाराला मिळते. कधी कधी यात अडचणही येते. अशी अडचण येऊ नये यासाठी वारसदाराचं नाव नोंदवणं महत्त्वाचं असतं. काही वेळा अनेकजण म्युच्युअल फंड फॉर्मवरील वारसदार या रकान्यात कुणाचंही नाव टाकत नाहीत. परंतु याची नोंद असणं खूप आवश्यक असतं.
का महत्त्वाचा आहे वारसदार ?
वारसदार म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या संपत्तीचा आणि पैशांचा मालक. तुमच्या मृत्यूनंतर योग्य व्यक्तीकडे संपत्ती जाण्यासाठी तुम्ही वारसदाराची नोंद करू शकता. तुम्हाला जिवंतपणी संपत्ती त्याच्या नावावर करायची नसून मृत्यूनंतर तुमची संपत्ती तुमच्या हक्काच्या व्यक्तीकडे जाण्यासाठी वारसदाराची नोंद करणं गरजेचं आहे.
कुणाचं नाव टाकू शकता ?
वारसदार म्हणून तुम्ही तुमच्या जवळच्या आणि विश्वासातील व्यक्तीचं नाव नोंदवू शकता. यावर तुम्हाला 3 वारसदारांची नावं नोंदवण्याची मुभा आहे. परंतु तुम्हाला यात कुणाच्या नावे किती संपत्ती किंवा म्युच्युअल फंड द्यायचा आहे हे देखील टाकावं लागाणर आहे. तुम्ही तसं न केल्यास समान वाटा त्या तिघांनाही देण्यात येईल.
लहान मुलाला वारसदार म्हणून नोंदवू शकतो ?
तुम्ही लहान मुलाला देखील वारसदार म्हणून नोंदवू शकता. परंतु यासाठी तुम्हाला त्याचा जन्म दाखला आणि गार्डियन देखील नोंदवावे लागणार आहेच. त्यांचा पत्ता आणि नाव नोंदवल्यानंतर तो वारसदार ग्राह्य धरला जाणार आहे. जर तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला त्याचे नाव वारसदार म्हणून नोंदवता येणार नाही.
किती वेळा बदलू शकता वारसदाराचे नाव ?
तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड अकाऊंटमध्ये हव्या तितक्या वेळा वारसदाराचं नाव बदलू शकता. यासाठी तुम्हाला केवळ फॉर्म भरून द्यायचा आहे. परंतु जर जॉईंट अकाऊंट असेल तर तुम्हाला त्या सगळ्यांची सही घ्यावी लागणार आहे. हल्ली अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी ऑनलाईन देखील वारसदार बदलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.