
50 रुपयात मिळवा ATM सारखे आधार कार्ड, घरबसल्या होईल डिलिव्हरी; ‘या’ पद्धतीने करा ऑनलाइन मागणी, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्त संस्था – आधार कार्ड महत्वाचे कागदपत्र आहे. हे बँक खाते आणि पॅनकार्डशी लिंक आहेच, शिवाय सरकारी योजनांमध्ये सुद्धा याची आवश्यकता भासते. आधार कार्डचा वापर आता आयडी कार्ड म्हणूनही होत आहे. अशावेळी तुमच्या जवळ सतत आधार कार्ड असणे आवश्यक आहे. बहुतांश लोकांकडे आधार कार्ड कागदावर प्रींट करून लॅमिनेशन केलेले असते. हे लवकर खराब होते. पण आता एटीएम कार्डसारखे पीव्हीसी आधार कार्ड सुद्धा मिळू शकते. हे स्पीड पोस्टने घरी पाठवले जाते. यासाठी ऑनलाइन मागणी कशी करायची ते जाणून घेवूयात…
पीव्हीसी आधार कार्डचे फायदे आणि फी
पीव्हीसी आधार कार्डची क्वालिटी चांगली असल्याने ते सहज पर्समध्ये ठेवता येते. यामध्ये होलोग्राम, Guilloche पॅटर्न, Ghost Image आणि मायक्रोटेक्स्ट सारखे सिक्युरिटी फीचर्ससुद्धा असतात. यातील क्यूआर कोडद्वारे ताबडतोब ऑफलाईन व्हेरिफिकेशन होते. यासाठी कार्डसाठी केवळ 50 रुपये शुल्क द्यावे लागते.
पीव्हीसी आधार कार्डसाठी असे अप्लाय करा
1 सर्वप्रथम युआयडीएआयची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in ओपन करा.
2 त्यानंतर माय आधार सेक्शनमध्ये ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करा.
3 यावर क्लिक करताच तुम्हाला 12 अंकांचा आधार क्रमांक किंवा 16 आकडी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकांचा ईआयडी नोंदवावा लागेल. या तिनपैकी एक टाकावा लागेल.
4 आधार नंबर टाकल्यानंतर खाली सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा कोड टाका.
5 यानंतर खाली सेंड ओटीपीवर क्लि करा. ज्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल.
6 ओटीपी टाकल्यानंतर सबमिट बटन क्लिक करा.
7 यानंतर स्क्रीनवर पीव्हीसी कार्डची प्रीव्ह्यू कॉपी येईल, ज्यामध्ये डिटेल्स असतील.
8 शेवटी पेमेंट ऑपशन येईल. त्यावर क्लिक करून अनेक डिजिटल माध्यमाने 50 रुपये भरू शकता.
9 15 दिवसांच्या आत स्पीड पोस्टने कार्ड तुमच्या घरी पोहचेल.