ऑनलाईन ड्रायव्हिंग परवाना मिळवण्यासाठी केवळ 6 प्रश्नांची द्यावी लागतील उत्तरे

पोलीसनामा ऑनलाईन : जर आपण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली एनसीआर किंवा झारखंडमध्ये रहात असाल तर आपल्याला अगदी सोप्या मार्गाने वाहन चालविण्याचा परवाना मिळू शकेल. या राज्यांमध्ये राहणारे लोक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यासाठी तुम्हाला फक्त परिवहन मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल आणि फॉर्मसह मागितलेले कागदपत्र अपलोड करावेे लागतील.

यासह, आपण टेस्टसाठी आपला एक स्लॉट देखील बुक करू शकता. स्लॉट बुक झाल्यानंतर अर्जदारास परीक्षेसाठी तारीख मिळेल, जी सोयीनुसार निवडले जाऊ शकतात. नवीन प्रक्रियेअंतर्गत अर्जदाराने स्लॉट बुक केल्यावर ऑनलाईन ड्रायव्हिंग परवान्यासाठी फी जमा करावी लागेल. त्यानंतर अर्जदार त्यांच्या सोयीनुसार परवाना परीक्षेची तारीख निवडू शकतात. ऑनलाईन फी जमा करण्याचा गेटवे वेबसाइटवरच देण्यात आला आहे.

अशी असते ऑनलाईन टेस्ट

अर्जदारास प्रथम लर्निंग लायसन्स दिला जातो, त्यापूर्वी अर्जदारास ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते. यासाठी तुम्हाला संबंधित परिवहन कार्यालयात ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल. या ऑनलाईन परीक्षेत एकूण 10 प्रश्न विचारले जातात आणि त्यांचे उत्तर अवघ्या 10 मिनिटांत द्यावे लागेल. जे अर्जदार 6 किंवा त्यापेक्षा जास्त 10 प्रश्नांची योग्य उत्तरे देतात त्यांना चाचणी उत्तीर्ण मानले जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाणपत्र अर्जदाराच्या मेल आयडीवर पाठविले जाते. आपण या प्रमाणपत्रांची प्रिंट आउट प्रत कोठूनही घेऊ शकता.

डीएलशिवाय वाहन चालविण्यास भारी दंड

देशातील नवीन मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर ड्रायव्हिंग परवान्याशिवाय वाहन चालविताना पकडल्याबद्दल 5000 रुपयांच्या दंडाची तरतूद आहे, जी आधी फक्त 1 हजार रुपये होती.