शेतकर्‍यांसाठी खुशबखर ! 4 % व्याज दराने घ्या 3 लाखांपर्यंत कर्ज, आजच KCC बनवा आणि लाभ घ्या, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळवण्यासाठी ‘किसान सम्मान निधी’शिवाय सरकारकडून स्वस्त दरात कर्ज दिले जात आहे. किसान क्रेडिट कार्डच्या (KCC) माध्यमातून शेतकऱ्यांना गरजेनुसार, सोप्या पद्धतीने कर्ज मिळेल. जर तुम्ही शेतकरी असाल तर KCC स्कीमचा फायदा मिळू शकतो.

ही कागदपत्रे गरजेचे

किसान क्रेडिट कार्ड फॉर्म सरकारी वेबसाईट PMkisan.gov.in वर उपलब्ध आहे. यामध्ये बँकेचे तीन डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत. आधारकार्ड, पॅनकार्ड आणि फोटो गरजेचा आहे. यासह शपथपत्रही देणे गरजेचे आहे. त्यामध्ये तुम्ही इतर कोणत्या बँकेत कर्ज घेतले की नाही याची माहिती देणे गरजेचे आहे.

असे बनवा कार्ड

जर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड बनवू इच्छित असाल तर तुम्हाला को-ऑपरेटिव्ह बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँक, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँकेशी (IDBI) संपर्क करणे गरजेचे आहे.

किसान क्रेडिट कार्डची वैधता 5 वर्षांची असते. या कार्डवर शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. तसेच शेतीसाठी कर्ज फक्त 9 टक्के व्याजदराने मिळते. मात्र, KCC वर शेतकऱ्यांना सरकार दोन टक्के सबसिडी देते आणि वेळेत KCC चे पेमेंट केल्याने 3 टक्के अतिरिक्त सूट मिळते.

स्वत:ची जमीन असणे गरजेचे

किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांसाठी दिले जाते. मात्र, शेतकऱ्यांकडे जमीन असणे गरजेचे आहे. शेतकरी जमीन गहाण न ठेवता 3 लाख रुपयांचे क्रेडिट कार्डवर कर्ज घेऊ शकता. KCC पाच वर्षांपर्यंत वैध असतो. तुम्ही या कार्डच्या माध्यमातून बी-बियाणे, कीटकनाशक खरेदी करू शकता.