Ration Card | तुमच्याकडे रेशन कार्ड नाही? मग करा घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सर्वसामान्य नागरिकांना सवलतींच्या दरात धान्य मिळावे यासाठी देशात रेशन कार्ड (Ration card) उपलब्ध केले. याच्या माध्यमातून लोकांना स्वस्त दरात धान्य मिळण्याची सुविधा मिळते. रेशन कार्डधारकांना शासनाच्या अनेक योजना अर्थात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंच्या माध्यमातून धान्य मिळण्याची सुविधा मिळवू शकता. कोरोनाच्या संकटात सरकारने गरीब व्यक्तींना साधारण दोन महिने मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर विविध राज्यात गरिबांना मोफत धान्य दिलं जाते. मात्र, नागरिकांकडे रेशन कार्ड (Ration card) जर नसेल तेव्हा त्याला घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईनद्वारे रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार आहे.

Gold Rates | सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ होणार, जाणून घ्या

कसा कराल अर्ज?

> रेशन कार्ड तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर त्या व्यक्तीच्या राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी http://www.mahafood.gov.in/ वर क्लिक करुन अर्ज करता येणार आहे.

> Apply online for ration card वर क्लिक करणे.

> रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी पुरावा म्हणून आधार कार्ड (Aadhar Card), वोटर आयडी (Voter ID) पासपोर्ट (Passport), हेल्थ कार्ड (Health Card), ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) दिले जाऊ शकते.

> रेशन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी शुल्क 5 रुपयांपासून 45 रुपयांपर्यंत लागणार आहे. अर्ज भरल्यानंतर ते शुल्क जमा करावे लागणार आहे. त्यानंतर अर्ज सादर करायचा आहे.

> फिल्ड पडताळणी झाल्यानंतर तुमचा अर्ज ग्राह्य झाल्यास अथवा योग्य ठरल्यास, त्या व्यक्तीचे रेशन कार्ड तयार होणार आहे.

Uddhav Thackeray : मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात 9 ते 12 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा, मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश

कोण करू शकणार अर्ज?

> भारताचा नागरिक रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतो.

> 18 वर्षांखालील कमी वयोगटातील मुलांचे नाव पालकांच्या रेशन कार्डमध्ये समाविष्ट केले जाते.

> 18 वर्षावरील लोक आपल्या वेगळ्या रेशन कार्डसाठी अर्ज करू शकणार आहे.

Pune News | ब्लॅक फंगसवरील उपचाराचा खर्च कमी करण्यासाठी पर्याय

रेशन कार्ड बनवण्यासाठी हे कागदपत्रे आवश्यक –

आधार कार्ड

– वोटर आयडी

– पासपोर्ट

– हेल्थ कार्ड

– ड्रायव्हिंग लायसन्स

– त्याशिवाय पॅन कार्ड

– पासपोर्ट साईज फोटो

– वीज बिल

– गॅस कनेक्शन बुक

– टेलिफोन बिल

– बँक स्टेटमेंट पासबुक

 

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे दिल्ली जाणार, पंतप्रधान मोदींची घेणार भेट !

Web Title : how to apply for online ration card know simple process