घर बसल्या पासपोर्ट काढायचाय मग फक्त ‘या’ स्टेप्स फॉलो करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची गरज लागते. पासपोर्ट बनवण्यासाठी अनेक जण पासपोर्ट ऑफिसमध्ये चकरा मारतात परंतु यामुळे त्यांचा खूप वेळ वाया जातो आणि तरीही त्यांचे काम होत नाही. तर काही लोक पासपोर्ट काढण्यासाठी एजंटच्या माध्यमातून प्रयत्न करतात आणि त्यांचा खर्च खूप वाढतो. मात्र आता तुम्ही घर बसल्या अगदी सहज रित्या पासपोर्ट काढू शकणार आहात.

पासपोर्ट काढण्यासाठी ही लागतात कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदानाचे ओळखपत्र
जन्म दाखला
ड्रायविंग लायसन्स

पासपोर्ट काढण्यासाठी त्या संबंधीच्या अधिकृत वेब साईटवर जा https://portal1.passportindia.gov.in/ त्यानंतर New User Registration च्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला नाव आणि जन्म तारेखेसारखी माहिती भरावी लागेल. तसेच तुम्हाला यामध्ये जवळच्या पासपोर्ट ऑफिसची निवड करावी लागेल.

यानंतर लॉगिन करण्यासाठी तुम्हाला आयडी आणि पासवर्ड बनवावा लागेल. त्यानंतर तुमचा इमेल आयडीवर Conformation चा मेल येईल. तुम्हाला यावर क्लिक करून ऍक्टिवेट करावे लागेल.

त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला एक मेल येईल ज्यामध्ये तुम्हाला एक्टीवेशनसाठी विचारले जाईल आणि तुम्हाला 1,500 रुपयांचे ऑनलाइन पेमेंट शुल्क स्वरूपात करावे लागेल. जर तुम्हाला 60 पाणी पासपोर्ट बनवायचा असेल तर दोन हजार रुपये भरावे लागतील. त्यानंतर तुम्ही निवडलेल्या पासपोर्ट कार्यालयात जाऊन कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन करावे लागेल त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन देखील केली जाईल.

सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोस्टाने तुमचा पासपोर्ट दिलेल्या पत्त्यावर पाठवला जाईल. या आधी तुम्ही पासपोर्टचा ऑनलाइन स्टेटस देखील तपासू शकता.

 

Visit : Policenama.com