वॅक्सिंगनंतर पुरळ आणि खाज सुटते का ? तर जाणून घ्या ‘हे’ 5 घरगुती उपचार, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – तुम्हाला वॅक्सिंगनंतर खाज सुटणे आणि पुरळ उठल्यामुळे त्रास होत असेल तर हे ५ घरगुती उपाय आहेत जे तुम्हाला या समस्येपासून मुक्त करेल

वॅक्सिंग करताना वारंवार वेदना होते, परंतु काही काळानंतर ही वेदना कमी होते. त्याच वेळी, काही लोकांना वॅक्सिंगनंतर पुरळ आणि खाज सुटण्याची समस्या उद्भवते. ज्यामुळे त्यांना बराच काळ त्रास होतो. वॅक्सिंग दरम्यान केस ओढल्यामुळे आणि तुटल्यामुळे छिद्र उघडतात. त्यामुळे छिद्र खुले होऊन त्यांच्यामध्ये विषाणू जाऊन पुरळ किंवा खाज सुटणे ही समस्या होते.
बर्‍याच लोकांना काही दिवसांत ती समस्या दूर होते. परंतु काही लोकांना याचा त्रास बर्‍याच दिवसांपर्यंत होतो. वॅक्सिंग करणे तर महत्वाचे आहे. त्यानंतरच्या समस्या कमी करणे देखील खूप महत्वाचे आहे. काही घरगुती उपचार करून या समस्या कमी करता येतील. पहिली गोष्ट म्हणजे वेक्सिंग मासिक पाळी दरम्यान करू नये, कारण या काळात त्वचा अधिक संवेदनशील असते. त्याच वेळी, वॅक्सिंगनंतर लगेच प्रदूषण किंवा गरम तापमान असलेल्या ठिकाणी जाऊ नये.

१) वॅक्सिंगनंतर कोरफडांच्या सहाय्याने पुरळ कमी करता येऊ शकते. पाय, हात, छाती आणि बिकिनी वॅक्सिंगनंतर कोरफड वापरुन आपण सूज आणि जळजळ कमी करू शकता. यासाठी कोरफड जेल चा वापर करावा. वॅक्सिंग केल्यानंतर जेल त्वचेवर लावा आणि मसाज करा. रात्रभर त्वचेवर जेल तसेच राहू द्या. आणि सकाळी पाण्याने धुवा. यामुळे आपण पुरळ, खाज सुटणे आणि जळजळ यासारख्या समस्या कमी करू शकता.

२)वॅक्सिंगनंतर पुरळ आणि जळजळ टाळण्यासाठी साखर मेणाचा वापर घरी केला जाऊ शकतो. ते तयार करण्यासाठी अर्धा कप साखर, ऑलिव्ह ऑईल किंवा नारळ तेल मिसळा. हे मिश्रण त्वचेवर लावा आणि हळू हळू स्क्रब करा.

३)वॅक्सिंगनंतर पुरळ आणि जळजळ टाळण्यासाठी लिंबाचा रस, नारळ तेल आणि टी ट्री तेल लावावे. जर आपल्याला खाज येत असेल तर आपण यासाठी बेबी पावडर देखील लावू शकता.

४)वॅक्सिंगनंतर खाज सुटल्यास नखांनी त्वचेला खाजवू नये. जर खूप खाज येत असेल तर आपण मऊ कापडाच्या मदतीने त्वचेला हलके रगडू शकता.

५)वॅक्सिंगनंतर त्वचेवर पुरळ उठत असेल तर थोड्या वेळासाठी बर्फाने हलके मालिश करा. पुरळ हलकी होईपर्यंत ही प्रक्रिया करत रहा. जर आपल्याला लवकर आराम हवा असेल तर आपण बर्फासह कोरफड किंवा काकडी देखील वापरू शकता. यासाठी कोरफड आणि काकडीचा रस एका भांड्यामध्ये पाण्यात ठेवून फ्रीजरमध्ये ठेवा. नंतर बर्फ झाल्यावर हळुवारपणे त्वचेवर मालिश करा. यामुळे पुरळ पासून आराम मिळेल आणि त्वचा मऊ होईल.